अखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा

By | December 1, 2017

manse claims attack on congress mukhyalaya was done by them sanjay nirupam condems attack

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयावर शुक्रवारी सकाळी हल्ला झाला. सुरुवातीला हा हल्ला नेमका कोणी केला याबद्दल स्पष्टता नव्हती. काहीवेळाने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून मोठया प्रमाणावर तोडफोड केली. काँग्रेस कार्यालयातील केबिनच्या काचा फोडल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.मोठया प्रमाणावर ही नासधूस करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..इट का जवाब पथ्थर से मिलेगा.. असे टि्वट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

सध्या फेरीवाल्यांच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि मनसेमध्ये संघर्ष सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा उधळून लावली होती. फेरीवाला मुद्द्यावर संजय निरुपम यांना सुप्रीम कोर्टाने देखील याआधी फटकारले आहे. विक्रोळीत दुकानदारांनी मराठी पाट्या लावाव्यात म्हणून केलेल्या मनसे कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांकडून मारहाण करण्यात आली होती. याआधी देखील मालाडला मनसेचे सुशांत माळवदे यांना देखील जबर मारहाण करण्यात आली होती.

विक्रोळीत झालेल्या हल्ल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केले होते. विक्रोळीत मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला. आमचा हिंसेवर विश्वास नाही पण गरीबांच्या पोटावर जेव्हा मनसेचे गुंड लाथ मारणार तेव्हा प्रतिक्रिया ही उमटणारच. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी असे संजय निरुपम यांनी टि्वटमध्ये म्हटले होते. संजय निरुपम सध्या गुजरात मध्ये काँग्रेस प्रचारासाठी गेलेले आहेत.

हल्ला झाल्यानंतर काही वेळातच मनसेकडून ह्या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली. लगेच संजय निरुपम यांनी देखील लगेच प्रतिक्रिया दिली,ते म्हणाले, ‘ मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष मुख्यालयाची तोडफोड केली. पोलीस स्टेशन फक्त 25 मीटर अंतरावर आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर चोख उत्तर देण्यात येईल, हेल्मेट लावून तोंड लपवून हल्ला करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे, याची आम्ही निंदा करतो’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे नेता संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशपांडेंसह पोलिसांनी मनसेच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे.दरम्यान मुंबईमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेचे झेंडे जाळले व मनसेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


मनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन

धक्कादायक: सत्ताधारी तसेच पालिका अधिकारी आणि झिरो नंबरची समांतर हफ्तेवसुली यंत्रणा

फेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन आता पुण्यातही : रस्त्यावर फेकून दिला परप्रांतीयांचा माल

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?