नोकरीचे आमिष देत बलात्कार करून सामाजिक कार्यकर्ता फरार : महाराष्ट्रातील घटना

By | February 12, 2018

maulana in nanded rape minor girl in madarasa

मानवाधिकार संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून दंतचिकित्सक असलेल्या डॉक्टर तरुणीला नोकरीचे आमिष देत वेळोवेळी बलात्कार केल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता असलेला डॉ. विजय बाळासाहेब मकासरे याच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही अत्यंत गरीब घाटातील असून वडील वारल्यानंतर तिने आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. चांगली नोकरी मिळाल्यास आई, बहिणीची काळजी घेता येईल, अशा नोकरीच्या शोधात होती.

याचदरम्यान तिची डॉ. मकासरे याच्याशी तिची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. मकासरे याने तिच्याशी हळू हळू जवळीक वाढवली..मी मानवाधिकार संघटनेचा मोठा पदाधिकारी आहे. पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी माझी चांगली ओळख आहे, मी तुला मोठ्या रुग्णालयात किंवा सरकारी दवाखान्यात नोकरीला लावतो. असे सांगत त्याने तिच्याशी ओळख वाढवत गेला. पुढे तरुणीच्या असहायतेचा फायदा घेत त्याने शिर्डी येथील हॉटेल्समध्ये व शासकीय विश्रामगृह येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मकासरे याने आपली फसवणूक केली आहे ते त्या तरुणीच्या लक्षात आल्यावर तिने त्याच्यासोबत संबंध तोडून टाकले मात्र तरीदेखील मकासरे याने याने माझा घटस्फोट झाला आहे, मी तुझ्याशी लग्न करतो, नाहीतर आत्महत्या करीन, अशी धमकी दिली. त्या तरुणीने स्पष्ट नकार दिला असता मकासरे याने तिला फक्त एकदा मला भेटण्याची संधी दे, असे सांगून बोलावले व जबरदस्तीने आळंदीला नेऊन लग्न केले व परत आपल्या घरी न नेता त्या तरुणीच्या घरीच नेऊन सोडले. त्या तरुणीचे नात्यात लग्न ठरले होते मात्र ह्या प्रकारानंतर ते देखील लग्न मोडलेले आहे . पीडित तरुणीने याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉ. मकासरे हा फरार झाला आहे .

संबंधित महिला डॉक्टर ही दंतचिकित्सक असल्याचे समजते . मात्र ती एका चांगल्या नोकरीच्या शोधात होती त्याच्यावेळी फेसबुकवर तिची व मकासरे ह्याची ओळख झाली होती. मानवाधिकार संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात व शिर्डीतील हॉटेल प्रतीक व नगरपंचायतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका हॉटेलवर अशा वेगवेगळय़ा ठिकाणी नेऊन वेळोवेळी बलात्कार करून मारहाण करून धमकी दिली. पोलीस सध्या मकासरे याचा कसून शोध घेत आहेत .

शिक्षकाच्या पवित्र पेशाला फासला काळिंबा.. गावकऱ्यांकडून चोप :महाराष्ट्रातील घटना

सासूच्या सल्ल्याने स्वतःच्या सख्ख्या अल्पवयीन भावाला ‘ ह्या ‘ कारणावरून संपवले : महाराष्ट्रातील घटना

अश्लील चित्रफीत दाखवून मौलानाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार : महाराष्ट्रातील घटना

शासकीय कार्यालयात महिलांसमोर अश्शील चाळे करणारा समाजकल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक धरला

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा