तब्बल २० शेतकऱ्यांचा मृत्यू ..४०३ जणांना विषबाधा : आता आली सरकारला जाग

By | October 8, 2017

how to save farmer pesticides cases maharashtra

पिकांवर कीटकनाशक फवारणी करत असताना यवतमाळ येथे विषबाधा होऊन तब्बल २० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यावर अखेर सरकारला जाग आली आहे . विनापरवाना कीटकनाशक विकणाऱ्या यवतमाळ जिल्यातील ५ कृषी केंद्रांवर शनिवारी गुन्हे नोंदवण्यात आले . यवतमाळातील कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे नोंदवल्याचे समजते .

कृषी प्रगती या दुकान, गोदामांची चौकशी केली असता जिल्या परिषदेच्या कृषी विभागाचा कोणताही परवाना ना घेता कीटकनाशक विक्री सुरु असल्याचे आढळले. तेथून १३ लाख रुपयांचा कीटकनाशकांचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे . तसेच दुसरे दुकान कृषी वैभव या दुकानाकडेही विनापरवाना कीटकनाशक विक्री सुरु होती. येथून साडेचार लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे . त्यानुसार दिलीप बोगावर व दिलीप चिंतावर यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत .

तसेच कळंब तालुल्यातील सावरगाव येथेही संजय राजा यांच्या जलरं कृषी केंद्रावर विनापरवाना कीटकनाशक विक्रीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे . तसेच दारव्हा येथील भेलोंडे एजेंसीच्या प्रवीण भेलोंडे यांच्या वर देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे , तर अंकिता ऍग्रो एजेन्सीचे प्रीतम राठी यांच्याविरोधात लाडखेड पोलीस ठाण्यात मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे .

आजवर फवारणीचे तब्बल २० मृत्यू झाले असून ४०३ जणांना विषबाधा झाली आहे . त्यामुळे जिल्हाभर कृषी केंद्र रडारवर आहेत .मारेगाव,झरी,आर्णी येथेही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरु आहे .

? पोस्ट आवडली तर लाईक करा ..शेअर करा ?