राम रहीम व आसाराम बापू यांना भोंदू ठरवणारे महंत अचानक बेपत्ता : घातपाताचा संशय

By | September 26, 2017

asaaram ram rahim

 

राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणा-या देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्तेमहंत तथा श्री. पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान अचानक बेपत्ता झाल्याने वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे.

ते बेपत्ता झाल्यापासून १० दिवस उलटूनही त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही . अखिल भारतीय षटदर्शन आखाडा परिषदेने याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी सकाळी आखाडा परिषदेची स्वामी सागरानंद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन चिंता व्यक्त करण्यात आली.

महंत मोहनदास हे १५ सप्टेंबरला हरिद्वारहून मुंबईकडे रेल्वेने निघाले, मात्र बेपत्ता झाले. हरिद्वारचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख तसेच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडेही याबद्दल तक्रार करण्यात आलेली आहे .

हरिद्वारच्या पोलिसांचे पथकही त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे,आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची यादी जाहीर केल्यानंतर मोहनदास यांना अनोळखी व्यक्तींकडून सतत धमकीचे फोन येत होते. त्याबद्दल त्यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. मात्र महंत मोहनदास यांचे संबंधित गुंडांकडून अपहरण करण्यात आले असावे , अशी शंका हरिगिरी महाराज यांनी व्यक्त केली आहे.

मेरठपर्यंत महंत मोहनदास यांच्या मोबाईलचे लोकेशन मिळत आहे, त्यानंतर मात्र फोनही लागत नाही. भोंदू बाबांची यादी जाहीर केल्यावर , महंतांचे असे गायब होणे हा निव्वळ योगायोग नसावा, यामागे गुरमीत राम रहीम, आसाराम बापू अशा किंवा यासारख्या तमाम भोंदू बाबांची यंत्रणा कार्यरत असावी असाही संशय व्यक्त केला जातोय .

?? पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा ??