संतापजनक : माधवी जुवेकर तुमच्यासारख्या मराठी अभिनेत्रीकडून ही अपेक्षा नव्हती

By | November 8, 2017

madhavi juvekar vulgar video dance at best dasara melava

आपण सेलेब्रिटी असाल तर आपले वैयक्तिक आयुष्य असते हे आम्ही समजू शकतो. आपल्या खाजगी आयुष्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही . मात्र ज्यावेळी आपण सेलेब्रिटी असता आणि पब्लिक मध्ये वावरत असता त्यावेळी किमान आपले फॅन दुखावले जाणार नाहीत आणि आपली संस्कृती यांचे किमान भान तरी ठेवायला हवे .

हिंदीत असलेला हिडीस प्रकार आता हळू हळू मराठी सिनेसृष्टीत देखील येऊ लागलाय म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही . पुण्यात देखील काही दिवसापूर्वी मराठी कलाकारांकडून अशीच हिडीस पार्टी सुरु होती, पुढे पोलिसांनी हस्तक्षेप करून ती उधळून लावली.असाच काहीसा प्रकार आता माधवी जुवेकर यांच्या बाबतीत घडला आहे.

आपल्या माहितीसाठी , माधवी जुवेकर ह्या बेस्ट मध्ये नोकरी करतात . त्यांचे इतर सहकारी व बेस्ट अधिका-यांचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे . ह्या व्हिडिओत बेस्ट अधिकारी अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यावर नोटा उधळताना दिसत आहे. नोटा कोणावर उधळतात हे आम्हाला वेगळे सांगायचे गरज नाही. मात्र लोकप्रिय कलाकारांना असे वागणे शोभते का ? असा सवाल आता लोक विचारत आहेत .तामण मराठी माणसांनी मान खाली घालावी असा हा व्हिडीओ आहे.

झी मीडियाच्या वृत्तानुसार , बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये दसरा मेळाव्याच्या कार्यक्रम सुरु होता. बेस्टच्या वडाळा आगारातील हा व्हिडीओ अत्यंत संतापजनक असून या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री माधवी जुवेकर बेस्टमध्ये कामाला आहेत.दसरा मेळाव्याच्या निमित्तानं कसा धांगडधिंगा घालण्यात आला, असा हा धक्कादायक व्हिडिओ आहे. बेस्टचे अधिकारी खुलेआम नोटांची उधळपट्टी करत असल्याचं त्यात दिसतंय. दोन महिलांमधली देखील अति जवळीक ह्या व्हिडीओ मध्ये किळस वाटावी अशी आहे . बेस्टमध्ये कामाला असलेल्या अभिनेत्री माधवी जुवेकर हिडीस डान्स करतात आणि बेस्टचे अधिकारी त्यांच्यावर पैसे उधळत असल्याचे ह्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसून येतंय.

आधीच बेस्ट तोट्यात आहे आणि कर्मचा-यांना महिन्याचा पगार वेळेवर मिळत नसताना अधिकारी वर्गाकडे उधळण्याइतपत पैसे आले कुठून ? हा देखील एक प्रश्न आहे . या हिडीस प्रकाराचा सविस्तर अहवाल बेस्टच्या दक्षता पथकानं बेस्ट प्रशासनाला पाठवून दिलाय. मात्र राजकीय दबावामुळं या प्रकरणावर पांघरूण घातले जात असल्याचं सांगितलं जातंय. बेस्ट डेपोचा डान्स बार करणा-या संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.

मात्र उधळलेल्या नोटा खोट्या असल्याचे स्पष्टीकरण माधवी जुवेकर यांनी दिले आहे. मात्र तो वादग्रस्त डान्स आणि एक महिला दुसर्या महिलेच्या तोंडातून नोट ओढून घेते यात फारसे काही आक्षेपार्ह नसून तो डान्स ची थीम म्हणून आम्ही केल. असेही त्या म्हणाल्या.

लिंक : https://www.youtube.com/watch?time_continue=1&v=4RIZaKxnrkw

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply