ब्रेकींग न्यूज:अखेर नगरमधील ‘ ह्या ‘ खटल्याचा निकाल आला : बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा

By | November 10, 2017

loni mavala rape case in ahmednagar parner to be hanged till death

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींना नगर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. संतोष विष्णू लोणकर (वय ३६), मंगेश दत्तात्रय लोणकर (३०) दत्तात्रय शंकर शिंदे (२७) अशी ह्या आरोपींची नावे आहेत. बलात्कार आणि खून प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे

ह्या तिघांवर कट रचून मग अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार केला, असा गुन्हा आहे. बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. क्रौर्याचा कळस म्हणजे , पुरावा सापडू नये तसेच ओळख पटू नये म्हणून चिखल लावून मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. सरकारी पक्षाने समोर आणलेले साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेऊन आरोपींना मृत्युदंड हीच शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली.अखेर उज्ज्वल निकम यांच्या प्रयत्नांना यश आले असेच म्हणावे लागेल.

याआधी , लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खूनखटल्यात सोमवारी (दि़ ६) जिल्हा न्यायालयात दोष सिद्ध झाला होता पण शिक्षा सुनावली नव्हती. शिक्षा आज सुनावण्यात येणार होती .आज १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निकाल देण्यात येणार असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी सांगितले होते. त्यानुसार आज न्यायाधीश केवले यांनी आरोपींना शिक्षा सुनावली.

कसे घडले हे हत्याकांड ?

दिनांक २२ ऑगस्ट २०१४ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी मावळा येथे, अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खुनाची घटना घडली. मुख्य आरोपी संतोष लोणकर याने सदर मुलीची छेड काढून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. पुढे संतोष लोणकरसह मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे यांनी तिचा पाठलाग केला. व एकटीला गाठून तिच्यावर अत्याचार केला .आरोपी संतोष लोणकर याने तिच्या डोक्यावर स्क्रू ड्रायव्हरने वार केले. मंगेश लोणकर याने तिच्या डोक्यात दगड घातला, तर दत्तात्रय शिंदे याने मुलीचे पाय पकडून ठेवले होते. तसेच मुलीच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या नाका तोंडात चिखल कोंबलाआणि तिच्या अंगावर सर्वत्र चिखल टाकला होता.

विकृतीचा कळस ठरावा असे हे प्रकरण घडल्यामुळे संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला होता. त्यामुळे या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला केली होती. ह्या शिक्षेमुळे गेलेली मुलगी येणार नाही मात्र जोरपर्यंत ह्या क्रूरकर्म्यांना फाशी होत नाही तोवर दुर्दैवी मुलीच्या आई वडिलांना न्याय मिळाला असे म्हणण्यात येणार नाही.

परत एकदा कमी कपड्यामुळे बलात्कार होतात हे म्हणणे खोटे ठरले आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?