मोबाईल नंबर आधारला लिंक करायचा मेसेज दिवाळीलाच का आला : मग नक्की वाचा

By | October 20, 2017

link mobile number to aadhaar card reality of these messages in diwali india

आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करा असा मेसेज आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आला तर दचकू नका . शासनाने आपले मोबाईल नंबर सोबत आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस सुरु केली असून हा त्याचाच मेसेज आहे.

३१ डिसेंबर पर्यंत मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक न केल्यास मोबाईल नंबर बंद होईल असे सांगितले जातेय,पण प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१८ पर्यंत केव्हाही तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक करू शकता. केंद्र सरकारने सर्व व्यवहार आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेत देखील आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्याच धर्तीवर आता मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक करण्याची सुरुवात करण्यात आलीये .

टेलिकॉम सेक्टर मधील सर्व कंपन्यांना याबद्दल आदेश देण्यात आले आहेत. सध्या नवीन कनेक्शन घेतेवेळी व्यक्तीला समोर ठेवूनच अंगठ्याचा ठसा घेऊन आधार कार्डशी लिंक करूनच मग नवीन सिम दिले जाते . मात्र ज्यांचे जुने कनेक्शन आहे, त्यांना देखील ही सक्ती करण्यात आली आहे .

कोणाचेही आधार कार्ड मूळ कागदपत्रांना जोडून कोणीही मोबाईल सिम कार्ड खरेदी करत असल्याचे आणि गैरव्यवहार करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे आता आधार कार्ड संबंधित व्यक्तीकडूनच अंगठ्याच्या ठशाने जोडले जाईल जेणेकरून फसवणूक, गैरवापर होण्याचे प्रकार कमी होतील. शिवाय गुन्हे घडल्यास तपास करणेदेखील सोपे होणार आहे .

सध्या दिवाळी चे मेसेज येत आहेत त्यामुळे लोकांचे मेसेज बघण्याचे प्रमाण देखील जास्त आहे . हे लक्षात घेऊनच दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल व आधार लिंक करण्याचे मेसेज पाठवले जात आहेत . काहींना व्हाइस कॉल देखील येत असून त्यात मात्र केव्हापर्यंत अशी मुदत सांगितली जात नाही . एका व्यक्तीच्या नावाने जास्तीत जास्त ९ सिम कार्ड घेतले जाऊ शकतात . मात्र सध्या एकाच व्यक्तीच्या नावावर १५-१६ सिम कार्ड असल्याची देखील उदाहरणे आहेत . मात्र जितके मोबाईल नंबर आहेत तितके अधिकृत ग्राहक आहे का नाही , याची माहिती सरकारला आवश्यक आहे,त्यामुळे हा लिंक चा निर्णय घेण्यात आल्याचे समजते .

मात्र सिटीझन फोरम च्या मते, सुप्रीम कोर्टाने सप्टेंबर २०१३ ते जून २०१७ पर्यंतच्या आधार संबंधी सर्व केसेसबद्दल आधार कोणत्याही सेवेसाठी सक्तीचे नाही असे सुनावले आहे .मात्र तरीही मोबाईल कंपन्या हे मेसेज पाठवून काय साध्य करू पाहत आहे हे मात्र समजत नाही .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?