बसल्या जागी मोबाईलला आधार कार्ड करा लिंक : ‘ ह्या ‘ सोप्या पद्धतीने

By | January 6, 2018

what supreme court says about linking aadhaar to mobile number

सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम आणि योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर आधार कार्ड ची सक्ती केलेली आहे .अर्थात ३१ मार्च पर्यंत बहुतांश अशा स्कीम तसेच मोबाईल, बँकिंग, पॉलिसी साठी देखील लिंकिंग गरजेचे राहणार आहे .एअरटेल पेमेंट बँकेकडून ह्या नियमाचा गैरवापर झाल्याचे उघड झाले होते. या नंतर मोबाइल फोन ग्राहकांच्या सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी करण्यासाठी ई-केवायसी प्रणालीचा वापर करण्यास भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकेस तात्पुरती बंदीदेखील केली होती. मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारने ग्राहकांकरवीच आपला आधार व मोबाईल लिंक करण्यावर भर देण्याचे ठरवले आहे.

केंद्र सरकारने मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड जोडणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत देऊ केली आहे. त्यासाठी आता मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअर ला जाण्याची गरज राहिलेली नाही. बसल्या जागेवर आपण आपल्या मोबाइलमधूनच लिंकिंग करू शकतो.

  • ही आहे पद्धत

१. कोणत्याही कंपनीच्या ग्राहकाने आधार क्रमांकाला मोबाइल जोडला आहे अथवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी फोनवरून १४५४६ हा क्रमांक डायल करावा.
२. योग्य त्या पर्यायाची निवड केल्यानंतर तुमचे नागरिकत्व तुम्हाला विचारले जाईल .
३. त्यानंतर फोनच्या कीपॅडवरून १ क्रमांक दाबून मोबाइल क्रमांक आधारला जोडण्याची परवानगी आपल्याला द्यावी लागेल.
४. त्यानंतर बारा अंकी आधार क्रमांक टाकून त्यापुढे निश्चित करण्यासाठी १ दाबायचा .
५. मग तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येईल. तो स्क्रीनवर टाइप करा.
६. त्यानंतर मोबाइल ऑपरेटर तुमची मंजुरी घेऊन तुमच्या आधार कार्डवरून तुमचे नाव, फोटो आणि जन्मतारीख आदी माहितीची खातरजमा करतो.
७. त्यानंतर तुमच्या मोबाइल क्रमांकाची खात्री करण्यासाठी आयव्हीआर मोबाइल क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांकांची मागणी करतो.
८. जर, तुमचा क्रमांक योग्य असेल तर एसएमएसद्वारे ओटीपी पाठवला जातो.
९. आता १ क्रमांक दाबून आधार आणि मोबाइल क्रमांकाच्या पुनर्पडताळणीची खात्री करा.
१०. जर तुमच्याकडे दोन मोबाइल क्रमांक असतील तर, दोन्ही क्रमांक टाइप करा. त्यानंतर आयव्हीआरकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करा.

ह्या सोप्या पद्धतीने देखील आपण आपला आधार कार्ड मोबाईल नंबर ला लिंक करू शकतो.

गोव्यामध्ये चक्क ‘ ह्या ‘ गोष्टीसाठी देखील होती आहे आधार कार्डची मागणी

गोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..’ ह्या ‘ गोष्टीला केली सुरुवात

आपल्या कोकणातही अनुभवता येणार गोव्याची मजा : सरकारने केला ‘ हा ‘ मास्टरप्लॅन

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा