लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

By | January 4, 2018

lekh on jignesh mevani umar khaled exposed

जिग्नेश मेवाणी हे गुजरातमध्ये उदयाला आलेला दलित राजकारणाचा चेहरा असल्याचे समोर आणलं जातेय . नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय देखील मिळवला. जिग्नेश मेवाणी यास दलित राजकारणाचा चेहरा म्हणून पुढे आणण्याचे कितीही प्रयत्न होत असले तरी द्वेषाने आधारलेले राजकारण फार काळ टिकत नाही. कदाचित यापुढे देखील थोडी प्रगती होईल मात्र मोदी सरकारला दोष देण्यापलीकडे ते जास्त काही करू शकणार नाही. आज या लेखाद्वारे आपण थोडे आंतरराष्टीय पातळीवर काय चालले आहे हे लक्षात घेऊया जेणेकरून ही मंडळी आताच का डोके वर काढत आहेत हे आपल्या लक्षात येईल.

पाकिस्तानमधून चीन सध्या सीपॅक नेत आहे .हा सीपॅक काही ठिकाणी हवाई, काही ठिकाणी रेल्वे तर काही ठिकाणी रस्त्याने जात आहे . हा पाकव्याप्त काश्मीर व बलुचिस्तानमधून जात आहे . आता आपण म्हणाल कि ह्याचा भारतात काय संबध, तर थॊडे अजून विषयाच्या खोलात शिरुयात . एकदा हा सीपॅक झाला कि पाकिस्तानमध्ये चीनचा प्रभाव भयानक वाढणार आहे, ह्या सीपॅकचे काम देखील सुरु झाले असून बलोचिस्तानमध्ये चिनी भाषा शिकण्यासाठी शाळा देखील उघडण्यात आलेल्या आहेत . पाकिस्तान मध्ये चीनचा प्रभाव वाढला कि बलुचिस्तान संपला म्हणून समजा.. आज ना उद्या जसे तिबेट गिळंकृत केले तसे बलुचिस्तान चीन गिळून टाकणार . आणि बलोचिस्तान मार्गे भारतात घेरण्याचा प्रयत्न १०० टक्के केला जाणार .आता चीन त्यांचे तेल पूर्व भारताला वळसा घालून आखाती देशांकडून विकत घेते. एकदा सीपॅक झाला कि हा खर्च चीनचा वाचेल आणि त्याचा वापर अधिकाधिक पद्धतीने भारताला घेरण्यासाठी होऊ लागेल. श्रीलंकेचे बंदर चीनने असेच ९९ वर्षाच्या करारावर घेतले आहे. भारताने आधीच सीपॅक ला विरोध केला आहे आणि चीन काहीही करून हा सीपॅक कारण्यासाठी पेटून उठला आहे. चीन हा बुद्ध धर्म मानणारा देश असल्याचे चित्र उभे केले जात असले तरी तिथे कुठेच धर्माला स्थान राहिलेले नाही.कुत्र्यांपासून तर जिवंत साप दारूमध्ये बुडवून मारतात . मानवी भ्रूण प्रोसेस करून पावडर बनवून खातात. यात कुठे आला होता अहिंसेचा बौद्ध धर्म आणि बुद्धाची शिकवण . ज्या प्रमाणे पाकिस्तान इस्लामचा आधार घेत जगाला वेड्यात काढताय असाच प्रकार चीन मध्ये .

आता भारताला आतूनच पोखरून काढायचे असे चीन व पाकिस्तानने ठरवले आहे . जिग्नेश आणि उमर कितीही आरडाओरडा करत असले तरी भरसभेत लाल सलाम करणे ,स्वतः निधर्मी असल्याचे सांगणे हे सगळे एक ढोंग आहे . भारत हिंसेच्या मार्गाने आपण लोकांची मानसिकता बदलू शकत नाही म्हणून त्यांनी लोकशाही मार्गाने पद्धतशीरपणे दलित व मुस्लिम बांधवाना आपले करण्याचा प्रयत्न केला आहे .अर्थात ही लोकशाही फक्त सत्ता काबीज करेपर्यंतच असते . जो प्रयोग चीनने नेपाळ व तिबेट मध्ये केला होता.नेपाळ मधील हिंदू राजवट यांनी माओवादाचा आधार घेऊन संपवली आणि तेच नेपाळी जे आधी राजाविरुद्ध लढले. ते आज बेकार आहेत. त्यांना नेपाळच्या सत्तेत काही स्थान नाही. ( कृपया ही लिंक पहा http://www.bbc.com/hindi/international-42269828 ) . नेपाळमध्ये सत्तापालट झाला आणि नेपाळच्या ठिकठिकाणी चीनचा प्रभाव दिसायला लागला. उद्या हेच बलोचिस्तानमध्ये होणार आहे आणि आपल्याला अनेक शत्रू तयार होणार आहेत. त्यामुळे जागतिक राजकारणामध्ये सरकारला घुसूनच द्यायचे नाही , स्थानिक पातळीवरच लढायला लावायचे हा देखील एक मोठा डाव ह्यामागे असण्याची शक्यता आहे.

भारतात हिंसक मार्गाने क्रांती होऊ शकत नाही त्यामुळे जिग्नेश मेवानी , उमर खालिद आणि कन्हैय्या कुमार सारखे लोक मुद्दाम जन्माला घालण्यात येत आहेत. पुण्याच्या भाषणात जिग्नेशने आता रस्त्यावर लढू किंवा जी हिंसक भाषा वापरली त्याचा सरळ रोख हा देशात यादवी माजली पाहिजे हा आहे . जेणेकरून यांना लोकशाही मार्गाने आलेली सत्ता उखडवून टाकता येईल. आताच ताज्या आलेल्या रिपोर्ट नुसार दंगलीमध्ये नक्षलवाद्यांचा देखील हात असल्याचा संशय आहे. म्हणजे त्यांना जे हवे आहे तेच जिग्नेश ने पुण्यामध्ये बोलवून दाखवले होते . 31 डिसेंबर 2017 च्या दिवशी पुण्यातील शनिवार वाडामधील आयोजित एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या लोकांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याची माहिती देखील समोर आली आहे.अर्थात केवळ दलित बांधवच नव्हे तर काही इतर धर्मातील देखील लोक,काही सत्तेतले उपाशी आत्मे आणि सत्तेबाहेरचे पैसेखाऊ लोक या हिंसेत ब्रेनवॉश करून सहभागी केले असण्याची शक्यता आहे.

जिग्नेश, उमर खालिद आणि कन्हैय्या कुमार हे फक्त चेहरे आहेत. यांच्या पाठीमागे खरे सूत्रधार हे सरकारने शोधायला हवेत. कितीही पेशवाई पेशवाई असे मोदी विरोधात ओरडत असले तरी मोदी ब्राह्मण नाहीत . राष्ट्रपती कोविंद देखील ब्राह्मण नाहीत . राहिला विषय अंबानींचा, केजरीवाल असो किंवा हे जिग्नेश, उमर खालिद आणि कन्हैय्या कुमार, सतत अंबानींच्या विरोधात खडे फोडत असतात . अंबानीनी काय मोदी सत्तेत आले तेव्हाच त्यांनी व्यवसाय सुरु केला आहे का ? पिढ्या घातल्या त्यांनी व्यवसाय सुरु करून वाढवण्यासाठी. धीरूभाईंच्या वेळी कुठे होती भाजप ? कुठे होता संघ परिवार ? तरी त्यांनी व्यवसाय वाढवले ना ? तुम्ही का नाही केले व्यवसाय ? का जेएनयूमध्ये सरकारच्याच नावाने ओरडत राहिले. स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर मोदी आणि अंबानी यांच्यावर फोडले कि सगळे विषय सोपे झाल्याचे समाधान मिळते. जिओ अंबानींचे वापरायच आणि शिव्या पण अंबानीलाच घालायच्या .जिओ यायच्या आधी सोन्याच्या भावाने डेटा विकत होतात हे वेगळ सांगायची गरज नाही . तुम्ही करायची होती कि एखादी कंपनी चालू. दाखवायचा होता अंबानींच्या बरोबरीने बिजिनेस करून . स्वतःला येत नाही आणि दुसर्याला नीट करू द्यायचे नाही. शॉर्ट कट मध्ये ज्यांना मोठं व्हायचंय असे लोक हे फंडे करतात पण जास्त काळ हे चालत नाही. आता असतील कदाचित तुमच्यामागे बाहेरचे हाथ म्हणून तुम्ही थोडे जास्त दिवस तग धराल पण लोकशाही मार्गाने तुम्ही पूर्ण सत्तेत कधीच येऊ शकणार नाही. २-४ आमदार आले तरी तुमच्यातला माज लोंकाना दिसायला लागला. माजोऱ्या लोकांना इथे उचलून आपटतात, याचा अनुभव तुम्हाला अजून यायचाच.

जे चीनने तिबेट मध्ये केले होते . तिबेट तर सोडा हो , माओवादाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा देखील माओ हेच सांगत होता . आमची सत्ता आल्यावर तुम्हाला जमिनी देऊ … हे करू ते करू ..चीन मध्ये सत्ताबदल झाला आणि ही सर्व आश्वासने गुंडाळून ठेवण्यात आली. लोकशाही मार्गाने विरोध केला तर अंगावर रणगाडे घालून लोक मारण्यात आले . हा यांचा गोरगरिबांना न्याय. अशांच्या मागे जाऊन कोणत्या समाजाचे काय भले होणार आहे ? युट्युब वर आपल्याला याचे अनेक व्हिडिओ सापडतील.

कितीही चेष्टा करा आणि कितीही नावे ठेवा आज मोदी सरकारच्या कूटनीतिला यश आल्याने पाकिस्तानची पूर्ण मदत अमेरिकेने बंद केली आहे . जोवर पैसे भेटत होता तोवर अमेरिका गोड होती. पैसे बंद झाला आणि अमेरिकेच्या नावाने पाकिस्तानी लोकांनी बोंबा मारायला सुरु केले.. ज्या देशात झपाटयाने विकास होऊ लागतो , तो शत्रूराष्ट्राच्या डोळ्यावर आला कि कि त्यात ख्वाडा घालण्यासाठी जाणीवपूर्वक असे लोक जन्माला घातले जातात. त्यासाठी पैसे व मीडिया उभा केला जातो. कधी लोकशाही मार्गाने अशा शक्ती उभ्या केल्या जातात तर कधी हिंसक पद्धतीने . अर्थात हे त्या त्या देशाच्या संस्कृतीवर अवलंबून आहे . लोकांच्या मोर्चाला क्रांती असे संबोधले जाते. क्रांतीच्या एका शब्दाने लोक वेडे होतात हे यांनी हेरले आहे . अमेरिकेने देखील ह्याच फॉर्मुल्याचा वापर करून इराक, लिबिया ,सीरिया संपवले आणि आता इराण मध्ये प्रयत्न सुरु आहेत.

सद्दाम ,गडाफी यांच्या विरोधातल्या आंदोलनाला क्रांतीचे स्वरूप दिले आणि सत्ताबदल घडवून आणला .अर्थात तसा प्रयत्न अमेरिका भारतात करणार नाही, कारण चीनच्या साम्यवादी राजवटीच्या विरोधात भारताची अमेरिकेला निदान आज तरी गरज आहे. अमेरिका हा एक लोकशाही असलेला देश आहे . आपला देखील लोकशाही असलेलाच देश आहे . भारत तेरे तुकडे होंगे .. अंशाल्लाह , म्हणणाऱ्या नालायकांचे आपण कधीच समर्थन करू शकत नाही. अर्थात यावर देखील ह्या मंडळींचे म्हणणे असते कि केस दाखल करा आणि खटला चालवा . भारत बोलण्याचा हक्क सर्वाना आहे , त्यामुळे कदाचित हे कोर्टात निर्दोष देखील सिद्ध होतील पण त्यांनी आमच्या मातृभूमीबद्दल बोललेले शब्द पुसले जाणार नाहीत. अशा व्यक्तींना केवळ जातीय राजकारणासाठी थारा दिला तर ती देशाशी सर्वात मोठी प्रतारणा ठरेल . आपला धर्म जात कोणतीही असो, आपण सर्व भारतीय आहोत. जय हिंद .. वंदे मातरम

अखेर मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणावर नाव न घेता केला ‘ ह्यांचे ‘ कडे इशारा

भिडे आणि एकबोटे यांच्याविरुद्ध याकूब मेमनप्रमाणे 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करावा

आपल्यावरील आरोपांबद्दल मिलिंद एकबोटे काय म्हणतात ? : कोरेगाव भीमा प्रकरण

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल : सविस्तर बातमी

२०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ? : वाद का तयार झाला

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा