आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत

By | December 12, 2017

how to earn money from youtube explained in marathi tutorial

आपण सर्वजण युट्युब वापरतो . प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये ऍटोमॅटीक युट्युबचे ऐप असते.त्यामुळे आपण सर्वजन युट्युब मध्ये व्हिडिओ बघतो, आवडला तर पुढे शेअर करतो. बऱ्याच जणांना हे माहित देखील आहे कि युट्युब ही गुगलचीच कंपनी आहे . मग युट्युब मधून पैसे कसे कमवले जाऊ शकतात, हे बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणून ही पोस्ट तयार केलीये .

आपण युट्युबवर जे विडिओ बघतो त्यावेळी साधारण ३ प्रकारच्या जाहिराती आपल्याला दिसत असतात . एक म्हणजे जी आपण स्किप करू शकतो , दुसरी म्हणजे जी आपण स्किप करू शकत नाही आणि तिसरी जेव्हा आपण व्हिडिओ बघतो त्यावेळी व्हिडिओ टाइमलाईन ला जिथे पिवळा डॉट असतो त्यावेळी येते (व्हिडिओ च्या समोर दिसते ) ती आपण क्रॉस वॉर क्लिक करून क्लोज करतो आणि व्हिडिओ बघत राहतो किंवा क्लिक करून त्या जाहिरातीच्या वेबसाईटवर जातो.

आता यात आपण पैसे कसे कमवू शकता ? सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्हिडिओ . तुमच्या व्हिडिओ ला जितके जास्त वेळ आणि जास्त संख्येमध्ये लोक पाहणार , त्यावर तुमचे इनकम अवलंबून असते . त्यासाठी तुमचा व्हिडीओ हा एकदम छान हवाय. जो पाहायला , लाईक करायला आणि शेअर करायला लोकांना आवडायला हवा. मग यासाठी आणखी एक गोष्ट म्हणजे, तुमचे ज्या क्षेत्रातील ज्ञान चांगले आहे त्यावर तुम्ही हा विडिओ बनवू शकता . कोणता असावा असे नाही बंधन नाही किंवा भाषेचे देखील कोणते बंधन नाही. चित्रपटाच्या रिव्यू पासून , तर चांगल्या रेसिपी बनवण्यापर्यंत किंवा मोबाईल ची माहिती पासून तर मित्र कसे जोडावेत इथपर्यंत काहीही चालेल. पण व्हिडिओ कायम कायम बनवून अपलोड केले तर इनकम साठी चांगले असते त्यामुळे शक्यतो आपले ज्ञान ज्यात आहे तसेच टॉपिक निवडावेत . मात्र अश्शील भाषा आणि अश्शील फोटो असे काही असेल तर गुगल आपल्याला घरचा रस्ता दाखवू शकते . म्हणजे आपले अकाउंट बंद करू शकते . एक सोपे गणित डोक्यात ठेवा , असा व्हिडिओ जो आपण आपल्या फॅमिली सोबत म्हणजे आई, बहीण ,वडील यांच्यासोबत पाहू शकेल असा व्हिडिओ असावा.

  • संबंधित बातम्या

बसल्या जागी मोबाईलला आधार कार्ड करा लिंक : ‘ ह्या ‘ सोप्या पद्धतीने

गोव्यामध्ये चक्क ‘ ह्या ‘ गोष्टीसाठी देखील होती आहे आधार कार्डची मागणी

गोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..’ ह्या ‘ गोष्टीला केली सुरुवात

मग आता सुरुवात कशी करायची , सर्वात आधी आपला एक जीमेल अकाउंट बनवायचं ,आधीच असेल तरीही उत्तम. . मग त्या अकाउंट मधून युट्युब ला लॉगिन करायचं ..एकदा लॉगिन झाले कि मग तिथे स्वतःचा चॅनेल सुरु करायचा .आणि चॅनेल म्हणजे विशेष काही नाही. जस आपण आपले नवीन ई-मेल अकाउंट ओपन करून करतो तसाच प्रकार असतो फक्त ज्यामध्ये आपण आपले विडिओ अपलोड करू शकतो किंवा किती जणांनी हे व्हिडिओ पाहिले हे देखील आपल्याला कळू शकते . पूर्वी युट्युब ला एकदा व्हिडिओ लोड केला कि लगेच जाहिराती आणि इन्कम सुरु होत होते. मात्र आता  युट्युबने केलेल्या नवीन नियमानुसार आपल्या युट्युब चॅनेलवर जाहिराती सुरु होण्यासाठी १ वर्षांमध्ये ४००० तासांचा  वॉचटाईम सोबत १ वर्षांमध्ये १००० पेक्षा जास्त स्बस्क्राइबर जर असतील तरच आपल्या व्हिडिओ मध्ये जाहिराती दिसू शकतील. जर आपण १ मार्च ला सुरुवात केली तर पुढच्या २० फेब्रुवारी पर्यंत आपल्याला हे टार्गेट पूर्ण करायचे आहे . अर्थात ही अट जाचक असली तर अशक्य असे नाही . हे पूर्ण झाले की मग आपल्याला आपले व्हिडिओ मॉनेटाईज करता येतात . पण त्यासाठी गुगल ला अप्लाय करावे लागते . जे एकदम सोपे आहे . ९९ टक्के गुगल रिजेकट करत नाही. एकदा गुगल ने अप्रूव्हल दिले कि मग तुमच्या व्हिडिओ वर देखील जाहिराती सुरु होतात आणि त्याचे इन्कम तुमच्या ऍडसेन्स अकाउंटला ( ऍडसेन्स हे गुगल चा जाहिरातीचे पब्लिशर लोकांचे प्लॅटफॉर्म आहे ) दिसायला लागते .

तुमच्या अकाउंट ला १० डॉलर झाल्यानंतर तुम्ही जो पत्ता दिला असेल त्यावर गुगलचा एक कोड पोस्टाने येतो तो आला कि तुम्हाला तो तुमच्या ऍडसेन्स अकाउंटला लॉगिन करून पेस्ट करावा लागतो , हे केले कि गुगल ला खात्री पटते कि तुमचा पत्ता बरोबर आहे . आधी ते ह्या पत्त्यावर चेक पाठवत मात्र आता बँकेत तुमच्या अकाउंटला पैसे जमा केले जातात . हे पैसे सिंगापूर मधून येत असल्याने तुमच्या बँकेकडे स्विफ्ट कोड असणे गरजेचे आहे. असा आपल्या बँकांना आयएफएससी कोड असतो तसा परदेशातून पैसे घेण्यासाठी स्विफ्ट कोड गरजेचं आहे . हा सगळ्या राष्ट्रीयीकृत बँकांकडे असतो. आपल्या अकाउंट ला १०० डॉलर झाले कि मग गुगल आपल्याला पैसे पाठवते . म्हणजे समजा १ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत १०० डॉलर झाले तर ते पैसे १०-१५ मे ला आपल्या अकाउंट मध्ये भारतीय रुपयात कन्व्हर्ट होऊन जमा होतात, मात्र जर १ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत १०० डॉलर झालेच नाही , समजा ४० डॉलर झाले तर ते १०-१५ मे ला बँकेत न येता तुमच्या ऍडसेन्स अकाउंटला क्रेडिट दाखवतात व पुढे जेव्हा १०० डॉलर होतील ,त्याच्या पुढच्या महिन्यात तुमच्या बँकेत अकॉउंट ला पाठवले जातात .

  • संबंधित बातम्या

बंद झालेली तुमची लाडकी सोशल मीडिया वेबसाईट ‘ ह्या ‘ नावाने येणार परत

गुड न्यूज :व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांसाठी ‘ ही ‘ गोड बातमी

ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

गुगल आलेल्या जाहिराती मधून काही पैसे स्वतःकडे ठेवते. यात ते ५५ टक्के ज्याचा व्हिडिओ आहे त्यांना देतात व ४५ टक्के स्वतःला घेतात . कारण युट्युब सारखा मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी बनवला आहे म्हणून. आपल्या व्हिडिओला जागा, आणि त्यांचा प्लॅटफॉर्म ते आपल्याला वापरायला देतात म्हणून . मात्र आपल्याला जे आपल्या अकाउंट ला दिसतात ते सगळे येतात. मात्र यात बँक काही रक्कम फी म्हणून घेते , ती साधारण अंदाजे ८००० रुपयाला २००-३०० रुपये अशी असते.

आज युट्युब मधून करोडो लोक पैसे कमवत आहेत. हा मार्ग सोपा आहे , मात्र कॅमेरा समोर बसायला थोडं शिकावं लागेल.एकदा चॅनेल पॉप्युलर झाला कि लाखो व्हूज एकदा दिवसात सुद्धा येऊ शकतात .आजही असे अनेक चॅनेल आहेत . मोठे मोठे टी.व्ही चॅनेल असोत वा लहान लहान संगीतकार किंवा शिक्षक , सर्वजण आपले ज्ञान प्रबोधनपर व्हिडिओ युट्युब वर टाकतात आणि जसे जसे व्युज येतात तसे पैसे कमवायला सुरु करतात . किचन पासून तर गिटार शिकवणे किंवा मोबाईल रिव्यू पासून ते चक्क गोष्टी सांगण्यापर्यंत काहीही टाका .. लिमिट नाही . फक्त कोणाची बदनामी होईल असे काही करू नका, कारण ह्या कारणाने जर तुमचे अकाउंट गुगल ने बंद केले तर परत गुगल कधीही तुम्हाला ह्या प्रोग्रॅम ला तुम्हाला जॉईन करून घेत नाही. प्रोग्रॅम खूप सोपा आहे तरीही एका टर्म्स वाचून ह्या आणि व्हा सुरु भरभरून भरभरून भरभरून भरभरून भरभरून पैसे कमवायला ..
अधिक माहितीसाठी लिंक व्हिजिट करा
https://creatoracademy.youtube.com/page/lesson/revenue-basics

  • संबंधित बातम्या

‘ ह्या ‘ पद्धतीने ओळखा सरकारी नोकरीसाठी आलेली फसवी जाहिरात

कुलभूषण यांच्या भेटीदरम्यान पाकड्यांचा मराठीवर देखील राग : सविस्तर बातमी

डेटा चोरीच्या आरोपाखाली यूसी ब्राऊजर ला दाखवला गुगलने बाहेरचा रस्ता

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा