लालूप्रसाद यांना तुरुंगात इतका पगार आणि तृतीयपंथी विचारतोय ‘ हा ‘ प्रश्न ?

By | January 7, 2018

laluprasad in jail getting 93 rs per day & trasngender asking questions about marriage

चारा घोटाळ्यात मुख्य आरोपी असलेले लालूप्रसाद यादव यांना तब्बल साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असून त्यांची रवानगी बिरसा मुंडा कारागृहात करण्यात आली आहे . मात्र त्यांना हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार असून त्यांना कैदी म्हणून माळीकाम देण्यात आले आहे ,अर्थात यासाठी त्यांना वेतन देखील देण्यात येणार असल्याचे समजते. प्रसारमाध्यमांच्या मते लालूप्रसाद यादव यांना प्रतिदिन ९३ रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे .

न्यायालयाच्या ह्या निर्णयाने राष्ट्रीय जनता दलामध्ये मोठी खळबळ उडाली असून ह्या शिक्षेवर कार्यकर्ते नाराज असून राष्ट्रीय जनता दलातर्फे उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तब्बल २१ वर्षांनी ही शिक्षा लालूप्रसाद यांना झाली आहे. चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात येथील सीबीआय विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना शनिवारी साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. न्या. शिवपाल सिंग यांनी शनिवारी दुपारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ माध्यमाद्वारे ही शिक्षा सुनावण्यात आली.

लालूप्रसाद यांना जेलमध्ये खाट आणि मच्छरदानी देण्यात आलेली आहे. शिवाय त्यांना रोज वाचण्यासाठी वर्तमानपत्र देण्यात येते . शिवाय टी.व्ही. देखील असून जेवण बनवण्याची किंवा बाहेरून जेवण मागवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. शिक्षा कोर्टाने सुनावली असली तरी खापर मोदी सरकारवर फोडण्यात आलेले आहे. जेलमध्ये आपल्याला एक तृतीयपंथी कैदी कायम लग्नासाठी गळ घालत असल्याची तक्रार लालूप्रसाद यांनी न्यायालयाकडे केली होती.

  • काय आहे चारा घोटाळा

आता झारखंड मध्ये असलेल्या तत्कालीन बिहार राज्यातील देवघर इथली सरकारी तिजोरीमधून सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले लांबून ९० लाखाचा अपहार करण्यात आला होता . मात्र प्रत्यक्ष हा चारा जनावरांपर्यंत पोहचलाच नाही मात्र कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले गेले. मुख्यमंत्री असूनदेखील लालूप्रसाद यांनी त्याकडे कानाडोळा केला होता . ह्या घोटाळ्याशी तब्बल ३३ खटले सुरु असून त्यात ६ खटल्यांमध्ये लालूप्रसाद यांचे नाव आहे.

नरेंद्र मोदींची चामडी सोलून काढू : ‘ ह्या ‘ नेत्याचे धक्कादायक विधान

मी चहा विकला पण ………. : मोदी काँग्रेसवर भडकले

सरकारमधून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यांच्या शतक पूर्तीसाठी उद्धव ठाकरेंना ‘ यांच्या ‘ शुभेच्छा

गुजरातमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू : शिवसेनेकडून आश्वासनांची गुजरातमध्ये खैरात

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा