रमेशभाऊंची गोल्डमॅन स्टाईल कॉपी करणाऱ्या शिवसेनेच्या गुजरातच्या उमेदवाराचे काय झाले ?

By | December 18, 2017

kunjal patel lost in gujarat shivsena candidate failed to save deposit also

गुजरात विधानसभा निवडणुकीत अहमदाबाद जिल्ह्यातील दारियापुर ५१ ह्या मतदार संघामध्ये शिवसेनेने दिलेले उमेदवार बरेच चर्चेत राहिले होते. यांचे नाव आहे कुंजल पटेल. आणि हे चर्चेत राहण्याचे मुख्य कारण म्हणजे ते गुजराथी गोल्ड मॅन आहेत  . रमेश भाऊ वांजळे हे मनसेचे गोल्ड मॅन होते मात्र वांजळे भाऊंची स्टाईल ह्या शिवसेना उमेदवाराने कॉपी तर केली मात्र रमेशभाऊंचा विजय कॉपी करता आला नाही.

विजय कॉपी करणे फार लांबची गोष्ट ..अत्यंत दारुण अशा पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. गोल्डन मॅन अशी ओळख असलेल्या या उमेदवाराला अपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही.निवडणूक प्रतिज्ञापत्रातही पटेल यांनी आपल्या संपत्तीचे केलेले वर्णन पाहिले तर डोळे दिपून जातील अशी संपत्ती त्यांनी दिली आहे. त्यांच्या घरी 115 तोळे सोने आहे. तसेच, ते 50 तोळे सोन्याचे दागिणे वापरतात.

दिरुयापुर-51 मतदारसंघातून पटेल यांची लढत कॉंग्रेसच्या शेख गयासुद्दीन हबीबुद्दीन यांच्यासोबत होती . हबीबुद्दीन यांनी 63712 मते मिळवली तर, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला 57525 मते मिळाली. तर गोल्डन मॅन कुंजल पटेल यांना केवळ 1393 मतांवर समाधान मानावे लागले.कुंजल पटेल यांची मते भाजपच्या पारड्यात टाकली तरी हबीबुद्दीन हेच निवडून आले असते. म्हणजे भाजपाच्या हिंदू मतांचे गुजरात मध्ये काहीच विभाजन झाले नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविणाऱ्या कुंजल पटेल यांनी प्रचार करताना सर्व दागिने परिधान करूनच प्रचार केला होता . हातात मोठी मोठी ब्रेसलेट, तर गळ्यात मोठमोठ्या चैनी अशा स्वरूपात ते प्रचाराला बाहेर पडत असत . मात्र मिरवून लोक मते देत नाही हे आता त्यांच्यादेखील लक्षात आले असावे. पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:ची संपत्ती 49 लाख इतकी असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपल्याकडे रोख 24 हजार आणि 45 तोळे सोने आणि दोन कार असल्याचे म्हटले आहे.

मोदींची जादू कायम : गुजरातमध्ये भाजपच तर हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस सत्ता गमावणार

मी चहा विकला पण ………. : मोदी काँग्रेसवर भडकले

नरेंद्र मोदींची चामडी सोलून काढू : ‘ ह्या ‘ नेत्याचे धक्कादायक विधान

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?