कुलभूषण यांच्या भेटीदरम्यान पाकड्यांचा मराठीवर देखील राग : सविस्तर बातमी

By | December 26, 2017

pakistan issues visa to wife and mother of kulbhushan jadhav

पाकिस्तानने इस्लामाबादमधील भेटीदरम्यान कुलभूषण जाधव आणि त्यांच्या पत्नी व आई यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली ती कुठल्याही आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल ला धरून नव्हती . हा संपूर्ण खेळ फक्त जागतिक दबावामुळे केला गेला आणि अशा पद्धतीने वागणूक देऊन पाकिस्तानने त्यांचेच हसे करून घेतले आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही . आई व पत्नी भेटायला जाणार तर ही भेट समोरासमोर होणे अपेक्षित आहे मात्र ही काचेआडूनच भेट व सोबत पाकिस्तानचे कॅमेरे व संपूर्ण सी.सी.टी.व्ही. चित्रीकरण यामुळे ही भेट होती कि फक्त देखावा अशा प्रश्न पडणे साहजिकच आहे. कुलभूषण जाधव हे मराठी असल्याने त्यांनी त्यांच्या आईसोबत व पत्नीसोबत मराठीमधून बोलणे साहजिक होते मात्र मराठी कळावी एवढी अक्कल पाकड्यांना नसल्याने मराठीमध्ये बोलण्यास बंदी घातली होती. या भेटीमध्ये (?) अक्षरश: मानवी मूल्य व आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलचे धिंडवडे काढलेले पाहायला मिळाले. अर्थात ह्या सर्व घटना प्री प्लॅन होत्या हे वेगळे सांगण्याची गरज नाही . पाकिस्तानच्या निर्दयीपनाची काही उदाहरणे

  1. कुलभूषण जाधव यांच्या डोक्यावर तसेच कानाच्या पाठीमागे मारहान केल्याचे वळ होते
  2. कुलभूषण यांच्या आई व पत्नी गाडीमधून उतरताच काही अंतरावर असलेले पत्रकार त्यांना ‘ एका दहशतवाद्याची आई व पत्नी असणे कसे वाटते ? तुमच्या मुलाने किती पाकिस्तानी लोकांचा बळी घेतला आहे ? तुमचा मुलगा दहशतवादी आहे का ? असे निर्लज्ज प्रश्न विचारले व त्यांना जेरीस आणले . यावर काही कारवाई करताना कोणीच दिसले नाही.
  3. कुलभूषण यांच्या आई व पत्नी यांना, कुलभूषण यांच्याकडे भेटायला जाण्याच्या वेळी कपडे बदलण्यास सांगण्यात आले . तसेच भारतीय सौभाग्याचे निशाण असलेले मंगळसुद्धा काढण्यास सांगण्यात आले. तसेच टिकली देखील काढण्यास सांगण्यात आली.
  4. कुलभूषण यांच्या भेटीच्या वेळी पाकिस्तानी दूत उपस्थित होता मात्र भारताच्या बाजूने कोणाला आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही.
  5. कुलभूषण यांना जाणीवपूर्वक मोठा जास्त लूज असलला सूट घालण्यात आला होता जेणेकरून आम्ही त्यांची नीट काळजी घेत आहोत असे दिसावे मात्र कुलभूषण जास्त थकलेले दिसत होते.
  6. मराठी भाषा पाकड्यांना कळत नाही म्हणून मराठीमध्ये बोलण्यास बंदी घालण्यात आली.
  7. कुलभूषण व त्यांची आई व पत्नी यांच्यामध्ये एक काच ठेवण्यात आली होती. कुलभूषण याच्या डेस्कवर एक फोन होता मात्र त्याला चिकटपट्टी लावलेली होती.व सर्व संभाषणाचे चित्रण व रेकॉर्डिंग करण्यात येत होते.
  8. कुलभूषण याचं भेट झाल्यावर जेव्हा त्या बाहेर आल्या त्यावेळी त्या झटकन गाडीमध्ये बसून जाणे क्रमप्राप्त होते मात्र असे न करता मुद्दाम ताटकळून ठेवण्यात आले व त्या वेळेमध्ये मिडियाला प्रश्न विचारणे व त्यांचे फोटो काढून आपल्या माणुसकीचे (कि अमानुषपनाचे ?) प्रदर्शन जगाला घडावे म्हणून गोंधळ घालण्यास मोकळे सोडण्यात आले.
  9. कुलभूषण यांच्या पत्नीची चप्पल मुद्दाम ठेवून घेण्यात आली.

अर्थात मंगळसूत्र काढायला लावणे , किंवा धार्मिक चिन्हे काढण्यास सांगणे हे आंतर राष्ट्रीय प्रोटोकॉलचे सर्रास उल्लंघन आहे. मात्र लातो के भूत बातो से नहि मानते .काचेच्या पलीकडून दिसणे आणि इंटरकॉमवर बोलणे हे भेट ह्या संकल्पनेत बसते का ? असा प्रश्न आता लोक विचारत आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पाकिस्तानला ह्या सर्व गोष्टीचे उत्तर द्यावे लागेल. कुलभूषण यांचे लवकरात लवकर आगमन व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे.

सोमवारी जाधव यांची आई अवंती आणि पत्नी चेतना सकाळी दुबईमार्गे विमानाने इस्लामाबादल्या पोहोचल्या होत्या . त्यांनी सुमारे अर्धा तास भारतीय दुतावासात घालवला. यानंतर या दोघी ‘आगा शाही ब्लॉक’ या परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीत गेल्या. काचेच्या भिंतीआडून कुलभूषण जाधव यांनी पत्नी आणि आईशी संवाद साधला. ही भेट सुमारे ४० मिनिटे चालली होती.

परत एकदा पाकिस्तानमध्ये घुसून भारताचा सर्जिकल स्ट्राईक : ४ पाकडे यमसदनी

पाकिस्तानच्या घरावर हिंदुस्थान जिंदाबाद आणि सारे जहाँसे अच्छा : काय आहे प्रकरण ?

ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

डेटा चोरीच्या आरोपाखाली यूसी ब्राऊजर ला दाखवला गुगलने बाहेरचा रस्ता

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

One thought on “कुलभूषण यांच्या भेटीदरम्यान पाकड्यांचा मराठीवर देखील राग : सविस्तर बातमी

  1. Pingback: कुलभूषण यांच्यावरून शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र : ‘ ह्या ‘ फोटोचा पडला विसर – Marathi People

Leave a Reply