छकुलीला अखेर न्याय मिळाला कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा : सविस्तर बातमी

By | November 29, 2017

ujjwal nikam demands death sentence to kopardi rape & murder case criminals

कोपर्डी प्रकरणातील तिघाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ अशी ह्या नाराधमांची नावे आहेत. अवघ्या पाच मिनिटांच्या आत तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खून आणि बलात्काराच्या शिक्षेखाली तिघांनाही जन्मठेप आणि फाशीची शिक्षा झाल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

सोबतच , जितेंद्र बाबुलाल शिंदेनं (आरोप क्रमांक १) पीडित मुलीचा विनयभंगासाठी तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. तसंच अज्ञान मुलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली जन्मठेप आणि २० हजार रुपयांची शिक्षा ठोठावण्यात आली.

संतोष गोरख बवाळ (आरोपी क्रमांक २) आणि नितीन गोपीनाथ भैलुमे (आरोपी क्रमांक ३) याला बलात्काराचा कट आणि आरोपी क्रमांक-१ ला गुन्ह्यासाठी उद्युक्त करणे या गुन्ह्यांसाठी जन्मठेप आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आरोपींना या सर्व शिक्षा एकत्रच भोगाव्या लागणार आहेत… यातील सर्वात कठोर शिक्षा ही फाशीची शिक्षा आहे. वरच्या कोर्टात जाण्याचा मार्ग आरोपींकडे उपलब्ध आहे.

मात्र याआधीच, मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष निश्चित करण्यात आला आहे. कलम 120 ए, 376 (बलात्कार) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये ह्या आरोपींवरील आरोप सिद्ध झालेले आहेत .

दरम्यान, ‘ज्या नराधमांनी माझ्या छकुलीचे लचके तोडले त्यांचेही लचके तोडा. या अाराेपींना जन्मठेप नव्हे, तर फाशीच झाली पाहिजे. त्याशिवाय नराधमांवर जरब बसणार नाही. जेणेकरून पुन्हा कोणाच्याही मुलीवर असा प्रसंग उद‌्भवणार नाही, आम्हाला सर्वांनीच साथ दिली. आता एवढीच अपेक्षा आहे की, युक्तिवादानंतर जो काही न्याय होईल तो फाशीचाच झाला पाहिजे. ही छकुलीच्या आईची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. उज्ज्वल निकम यांनी आमच्या मुलीला न्याय मिळवून दिला.अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या अाई-वडिलांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केली. या घटनेमुळे संपूर्ण समाज एकत्र अाला याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.

निकाल येताच त्याचे स्वागत म्हणून न्यायालयाबाहेर घोषणा देण्यात आल्या. उज्जल निकम साहेबाचा विजय असो तसेच एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी न्यायालयाचा परिसर दुमदुमून गेला होता .

कोपर्डीचे नराधम न्यायालयात काय बोलले ? : कोपर्डी अपहरण व खून खटला

अखेर कोपर्डी केसच्या अंतिम युक्तिवादास सुरुवात : उज्ज्वल निकम मांडताहेत सरकारची बाजू

‘ ह्या ‘ कारणामुळे नाही होऊ शकला कोपर्डी केसचा अंतिम युक्तिवाद

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?