‘ ह्या ‘ कारणामुळे नाही होऊ शकला कोपर्डी केसचा अंतिम युक्तिवाद

By | October 11, 2017

संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी खटल्यातील आरोपी संतोष भवाळचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे आज अहमदनगर जिल्हा न्यायालयात सुनावणीस उपस्थित राहू शकले नाहीत . बुधवारी पुणे येथून नगरला येताना वाघोली येथे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले . त्यामुळे ह्या खटल्याची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली.त्यामुळे पुढील सुनावणी २६,२७,२८ आॅक्टोबर रोजी होणार आहे.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची अहमदनगर जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे़ या खटल्यात सरकारी व बचाव पक्षाच्यावतीने सर्व साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली आहे. आता फक्त शेवटचा युक्तिवादच बाकी आहे़ बुधवारी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे सरकारी पक्षाच्या वतीने अंतिम युक्तिवाद करणार होते. मात्र आरोपी संतोष भवाळ याचे वकील खोपडे न्यायालयात उपस्थित न राहिल्याने सुनावणी होऊ शकली नाही .

अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयाला सांगितले की, खटल्याचे कामकाज लवकर पूर्ण व्हावे यासाठी मी कोल्हापूर येथील कामकाज आटोपून रात्री प्रवास करून नगरला पहाटे पोहोचलो. आरोपीचे वकील मात्र पुण्याहून नगरला येऊ शकले नाहीत ही खेदाची बाब आहे. जर येणे अशक्य होते तर त्यांनी फोन करून कळविणे गरजेचे होते़ आमचा देखील वेळ वाचला असता. शिवाय पुणे येथून नगरला येण्यासाठी वाघोली हा एकमेव मार्ग नाही ते दुस-या मार्गानेही येऊ शकत होते़. अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे पुढील सुनावणीला हजर राहतील अशी अपेक्षा आहे असे निकम म्हणाले़

आता सरकारी पक्ष व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद बाकी असल्याने हा खटला अंतिम टप्प्यात आहे.कोपर्डी प्रकरणाने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता आणि मराठा क्रांती मोर्चाची पायाभरणी ह्या प्रकरणामुळेच झाली होती .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply