अखेर कोपर्डी केसच्या अंतिम युक्तिवादास सुरुवात : उज्ज्वल निकम मांडताहेत सरकारची बाजू

By | October 27, 2017

kopardi case antim yuktiwad ujjwal nikam in court

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला आज विशेष नगर जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरवात झाली. मागील वेळी आरोपीच्या बाजूने युक्तिवाद करणारे ऍड. खोपडे हे वाघोली पुणे येथे झालेल्या ट्रॅफिक जाम मुळे कोर्टात वेळेवर पोहचू शकले नव्हते.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. पीडित मुलीचा मृत्यू अनैसर्गिक असून, तसे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्याचे सांगून परिस्थितीजन्य पुरावे, कायदा आणि तर्कशास्त्रानुसार आरोपींनी कट रचल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी न्यायालयास पुराव्याचा हवाला देत सांगितले.. आरोपींविरोधात सरकार पक्षाने 24 मुद्दे सिद्ध केले असून, पीडित मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले . त्यासाठी पुराव्यादाखल न्यायवैद्यक अहवालांचे दाखले देखील देण्यात आले.

आरोपी शिंदेला घटनास्थळावरून पळून जाताना काही साक्षीदारांनी पाहिल्याचेही त्यांनी सांगितले. आरोपी संतोष भवाळ, नितीन भैलुमे घटनास्थळी नसले, तरी परिस्थितीजन्य पुराव्यांवरून त्यांचे गुन्ह्यात संगनमत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगत ऍड. निकम यांनी न्यायालयात सुनावणीदरम्यान मांडलेल्या पुराव्यांचा उल्लेख केला.

ह्या घटनेच्या आधी पीडित मुलीची छेडछाड करताना हे तिन्ही आरोपी सोबत होते आणि त्याआधी जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुमेचा फोन झाल्याचा पुरावा सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. तिन्ही आरोपींनी कट करून तिचे अपहरण करून अत्याचार व खून केला. याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळणे फार कठीण आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा विचार करता निष्कर्ष व अनुमानावरून ते स्पष्ट होते, असेही ऍड. निकम यांनी पूर्वीच्या काही केसचे उदाहरण देत सांगितले.

न्यायालयाने आज अंतिम युक्‍तिवादाचे ध्वनिमुद्रण केले. हे ध्वनिमुद्रण सीडी अथवा पेन ड्राइव्हमध्ये टाकून दोन्ही पक्षांच्या वकिलांना देण्यात येणार आहे. अंतिम युक्तिवादाच्या ध्वनिमुद्रणाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. असे ध्वनिमुद्रण विदेशात केले जाते

कोपर्डीत मुलीचे अपहरण करून अत्याचार करून खून केला गेला होता .या नंतर सर्व मराठा समाज आरोपींच्या विरोधात रस्त्यावर एकवटला होता. मराठा मूक क्रांती मोर्चाची सुरवात होण्याचे हे एक मुख्य कारण ठरले होते.

आरोपीचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे, ऍड. योहान मकासरे, ऍड. प्रकाश आहेर उपस्थित होते. अंतिम युक्तिवादानंतर लवकरात लवकर कोर्टाचा निर्णय येईल व त्या मुलीला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आपण आशा करूयात.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?