कोपर्डी प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी

By | November 22, 2017

what kopardi accused said in court

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त दै. लोकमत ने दिले आहे . आहेर यांनी युक्तिवाद करताना दोषीच्या कुटुंबाचा विचार करून कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. ही धमकी मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास देण्यात आल्याचे दै. लोकमत ने म्हटले आहे. ऍड. आहेर यांनी यासंदर्भात याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात अाहेर यांनी तक्रार दाखल केली अाहे

दरम्यान, कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची आज सुनावली जाण्याची शक्यता आहे. शिक्षेच्या सुनावणीनिमित्त अहमदनगर कोर्टाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या खटल्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे सर्वांचंच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, सुनावणीवेळी कोर्ट परिसरात मोठी गर्दी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष निश्चित करण्यात आला आहे. कलम 120 ए, 376 (बलात्कार) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये ह्या आरोपींवरील आरोप सिद्ध झालेले आहेत . त्यामुळे ह्या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 22 नोव्हेंबरला होऊ शकतो.

२२ नोव्हेंबरलाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व आरोपी संतोष भवाळ याचे वकील आपली बाजू मांडतील. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली आहे.मात्र फाशी कि जन्मठेप कोणत्या शिक्षेची मागणी करणार हे स्पष्टपणे सांगितलेले नाही. तर आरोपींच्या वकिलांकडून आरोपीच्या जबाबदाऱ्याचा विचार करून कमी शिक्षा देण्याची मागणी केली जाईल.

मात्र आरोपींवर ज्या कलमांतर्गत दोष सिद्ध झाले आहेत, त्यानुसार त्यांना कमीत कमी जन्मठेप आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होऊ शकते.कलम 120 ए, 376 (बलात्कार) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये ह्या आरोपींवरील आरोप सिद्ध झाले आहेत. तिसरा आरोपी संतोष गोरख भवाळ (वय 30, रा. खांडवी, हल्ली रा. कोपर्डी) याच्या वतीने उद्या (ता. 22) बाजू मांडण्यात येणार आहे. तसेच सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम शिक्षेवर युक्तीवाद करतील . त्यानंतर दुपारी आरोपीला शिक्षा देण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

कोपर्डीचे नराधम न्यायालयात काय बोलले ? : कोपर्डी अपहरण व खून खटला

फाशी कि जन्मठेप ? छकुलीची आई काय म्हणते ? : संपूर्ण कोपर्डी प्रकरण माहिती

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?