काही गुण रक्तातच : जाणून घ्या रक्तगटावरून तुमचा स्वभाव

By | November 26, 2017

know your character as per your blood group

काही गुण रक्तातच असतात असा आपण कायम ऐकत आलो आहोत. अर्थात रक्ताचे नक्की माहित नाही मात्र रक्तगटामध्ये मात्र काही गुण असतात . आपला रक्तगट कोणता आहे यावर आपला स्वभाव, वागण्याची पद्धत,नेतृत्व गुन काही प्रमाणात अवलंबून असतात .अर्थात हे १०० टक्के खरेच आहे याचा काही वैज्ञानिक पुरावा आजवर आलेला नाही.

अनेक ठिकाणी मुलाचा आणि मुलीचा ब्लड ग्रुप तपासुनच त्यांचा जीवनसाथी निवडला जातो. कुठल्याही व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या ब्लड ग्रुपवरुन ओळखला जातो असे बहुतांश देशातील नागरिक देखील मानतात .तर पाहू या आपला रक्तगट आणि त्याच्याशी संबंधित काही खास माहिती .

A रक्तगट ग्रुप:
A ब्लड ग्रुप असलेल्या नागरिकांत नेतृत्व कौशल्य असते असते. यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास असतो. या ब्लड ग्रुपची व्यक्ती इतरांनाही आपल्यासोबत घेऊन यश मिळवण्यावर विश्वास ठेवतात.
A ब्लड ग्रुप असलेले व्यक्ती जबाबदार, संवेदनशील, काळजी करणारे आणि आयुष्यात चांगले मित्र बनू शकतात. ए ब्लड ग्रुप असलेली व्यक्ती कोणतीही गोष्ट करण्याआधी इतरांबाबत खूप विचार करते.

B रक्तगट ग्रुप:
B ब्लड ग्रुप असलेली व्यक्ती इतरांसोबत पटकन मिसळतात. A रक्तगट ग्रुप पेक्षा ह्या व्यक्ती इतर व्यक्तींमध्ये फार झटपट मिक्स होतात ,थोडक्यात खूपच जास्त फ्रेण्डली असतात, मात्र बऱ्यापैकी स्वार्थीही असतात. तसेच अशा व्यक्तींचा दृष्टिकोन बहुतांश नकारात्‍मक असतो.मात्र मेहनत करण्याची तयारी कायम असते आणि मेहनतीच्या जीवावर आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवू पाहतात.मेहनत करून यश मिळवण्यावर यांचा विश्वास असतो.

AB रक्तगट ग्रुप:
एबी ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्ती स्मार्ट आणि हूशार असतात मात्र ह्यांचा स्वभाव शांत असतो. तसेच ह्या व्यक्ती कधी काय करू शकतील याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. मात्र हे लोक चांगले असतात. तसेच फक्त वर वर पोपटपंची करण्यापेक्षा जिवलग व खरे मित्र बनवण्याकडे यांचा कल असतो.

O रक्तगट ग्रुप:
O रक्तगट ग्रुप ज्यांचा आहे अशा व्यक्ती सकारात्मक असतात तसेच इतरांना मदत करायला त्यांना मनापासून आवडते. त्यांच्यामध्ये एक चांगला नेता बनण्याचे गुण असतात . मेहनत करून यश मिळू शकते यावर त्यांचा विश्वास असतो.

जातपडताळणीच्या अटी मध्ये करण्यात आलाय एक ‘ महत्वपूर्ण ‘ बदल: पुढे वाचा

आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?