खोटारडा अपप्रचार तोंडघशी .. कठुआ मध्ये बलात्कारच : दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट

By | April 21, 2018

kathua case delhi forensic report

कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणाने सगळा देश हादरला. दुर्दैवाने ह्या घटनेचे देखील नको तितके घाणेरडे राजकारण केले गेले. काही विकली गेलेली वृत्तपत्रे आणि वेब पोर्टल ने तर हा प्रकार बलात्काराचा नाहीच असे सांगत आपल्या अकलेचे तारे तोडले होते . त्याच त्या पोस्ट शेअर करून कित्येक आंधळ्या नागरिकांनी देखील आपण म्हणू तेच खरे असे सांगण्याचा नव्हे, तर ठसवण्याचा देखील पुरेपूर प्रयत्न केला होता मात्र अखेर त्यांचा पर्दाफाश झाला असून कठुआ मध्ये चिमुरडीवर बलात्कार झाल्याचा रिपोर्ट आला आहे . पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढल्याचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या प्रकरणातील नराधमांना शिक्षा देण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातो आहे. दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबने या संदर्भातला अहवाल दिला आहे.

दिल्लीतील फॉरेन्सिक लॅबमध्ये १४ पाकिटे तपासली. मृत पीडितेचा व्हिसेरा आणि आरोपींच्या रक्ताचे नमुने एकमेकांशी जुळवण्यात आले ते जुळत असल्याचेही समोर आले आहे. बलात्कार झालेल्या पीडित मुलीच्या अंगावर असलेली सलवार आणि फ्रॉक यावर लागलेली माती, रक्ताचे डाग हे देखील तपासण्यात आले. हे डाग १ ते २१ मार्च या कालावधीतले आहेत असेही दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.

पोलिसांनी ज्या नराधमांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत त्यांच्या डीएनए पीडितेच्या अंगावर सापडलेल्या रक्ताशी व वीर्याशी जुळला आहे. या प्रकरणातला हा मोठा पुरावा मानला जातो आहे. या पुरावाच्या आधारे या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा होण्यास हातभार लागणार आहे. या मुलीच्या दोन केसांचे नमुनेही आम्ही फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते. हे केस आम्हाला मंदिरात सापडले होते. आम्हाला सापडलेल्या दोन केसांपैकी एक पीडित मुलीचा आणि एक आरोपीचा असल्याचा अहवाल आलेला आहे .

या मुलीच्या फ्रॉकवर असलेले डाग डिटर्जंट पावडने धुण्याचा प्रयत्न झाला आहे हे देखील अहवालामध्ये समोर आले आहे. मात्र काही रक्ताचे डाग या फ्रॉक आणि सलवारवर जे राहिले आहेत. जे आरोपींच्या रक्त नमुन्याशी जुळत असल्याचे देखील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जम्मू काश्मीरमधील कठुआ या ठिकाणी एका ८ वर्षांच्या मुलीवर सात दिवस बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या सगळ्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले. त्यानंतर आता फॉरेन्सिक अहवालाच्या मदतीने पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा लागला आहे.

काम मिळवायचे असेल तर महिला पत्रकार सेक्स करण्यासही सहज तयार होतात: संस्कारी भाजप नेत्याचे सुसंस्कृत विचार ?

‘ ह्या ‘ कारणामुळे भाजपच्या मंत्र्यावर अखेर सगळ्या महिलांची माफी मागण्याची वेळ

दारूच्या ब्रँडला महिलेचे नाव द्या मग विक्री वाढेल : भाजपच्या ‘ ह्या ‘ मंत्र्यांचे दुर्दैवी विधान

जिभेला हाड नसणाऱ्या अशाच काही भाजपपासून ते काँग्रेसपर्यंतच्या नेत्यांची ‘ वादग्रस्त ‘ विधाने

बाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय ?: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्या पेट्रोल पंपावर कोणाचा होता डोळा ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

‘ ह्या ‘ व्यक्तीच्या सांगण्यावरून झाली केडगावमध्ये हत्या : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा