सनी लिओनी आणि कर्नाटकमध्ये सामूहिक आत्महत्या : काय आहे बातमी ?

By | December 16, 2017

what sunny leone says about meetoo campaign for females

नवीन वर्षानिमित्त होणारे कार्यक्रम ही कलाकारांसाठी झटपट जास्त पैसे कमावण्याची संधी असते. मग ते बॉलीवूड असो किंवा हॉलीवूड. मात्र आता याला देखील आता ते सेलेब्रिटी पाहून काही प्रमाणात विरोध होऊ लागला आहे . विशेषतः हिंदुत्ववादी संघटना या विरोधात आक्रमक होत असून नवीन वर्षासाठी होणाऱ्या कार्यक्रमांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे .अर्थात सर्वात आधी टार्गेट केलं गेलय सनी लिओनीला.

सनी लिओनीचा बंगळुरू इथे नवीन वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता मात्र कन्नड रक्षण वेदिके ह्या हिंदूवादी व प्रांतवादी संघटनेने ह्या कार्यक्रमास तीव्र विरोध केला आहे. ‘ सनी नाईट इन बंगळुरू २०१८ ‘ या नावाने हा कार्यक्रम करण्यात येणार होता . मात्र इतरही काही संघटना ह्या कार्यक्रमाला विरोध करत आहेत हे लक्षात घेऊन कर्नाटक सरकारनेच सनीच्या या न्यू इअरच्या कार्यक्रमावर बंदी घातली आहे.अशा कार्यक्रमा मुळे युवा पिढीकडे चुकीचा संदेश जातो तसेच ते आपल्या मूळ कन्नड संस्कृतीपासून दुरावत आहेत असा ह्या संघटनांचा आरोप आहे . ह्या कार्यक्रमाच्या निषेधार्थ काही ठिकाणी सनी लिओनीचे फोटो देखील जाळण्यात आले. अखेर कन्नड संघटनांननी केलेल्या विरोधानंतर आता नविन वर्षाच्यानिमित्ताने राज्यात कुठेही कार्यक्रम होणार नसल्याचं कर्नाटक सरकारतर्फे सांगण्यात आलाय.

काही भागात मोर्चे काढून सनीच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले. सनीला कार्यक्रमासाठी राज्यात बोलवणे म्हणजेच संस्कृतीवर हल्ला झाल्यासारखंच आहे असे आरोपही करण्यात आलेत. सनी लिओनीने जर बंगळुरुमध्ये कार्यक्रम केला आम्ही मोठ्या संख्येने सामूहिक आत्महत्या करु अशीही धमकी सरकारला देण्यात आली . अर्थात सरकारच्या ह्या निर्णयाचे बऱ्याच लोकांनी समर्थन देखील केले आहे . कर्नाटकमध्ये सध्या कॉंग्रेसचे सरकार असून याआधी कॉंग्रेस सरकार कडून सहसा हिंदुवादी संघटने पुढे झुकण्याचे प्रकार झाले नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस आता सोफ्ट हिंदुत्वाचा सहारा घेत आहे का ? असा प्रश्न देखील लोक विचारत आहेत

परत एकदा सनी लिओनचे न्यूड फोटोशूट ‘ ह्या ‘ कारणासाठी

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?