रमण राघवला लाजवेल असे घडले नागपूरचे हत्याकांड : एकाच रात्रीत ५ जणांनी गमावला जीव

By | June 12, 2018

kamalakar pavankar murdered in nagpur

तो माणूस नाही, सैतान आहे, घात करेल, त्याला घरापासून दूरच ठेवा.. हा इशारा होता, वृद्ध मीराबाई पवनकर यांचा. क्रूरकर्मा विवेक पालटकर याने आपल्या घरी येऊ नये, कुटुंबियांनी त्याच्यासोबत संबंध ठेवू नये, म्हणून मीराबाईने अखेरपर्यंत जीवाचा आटापिटा केला होता. मात्र मीराबाईंच्या बोलण्याला दुर्लक्षित केले गेले आणि विकृत विवेक पालटकरने मीराबाईंसह त्यांचेअवघे कुटुंबच संपविले.कुटुंबाचा आधारवड असलेल्या ज्येष्ठांच्या अनुभवी शब्दांना सध्या महत्त्व दिले जात नाही. त्यांचे शब्द, सल्ला अन् इशारे याकडे दुर्लक्ष केल्यास किती भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात, याचे हे एक उदाहरण म्हणावे लागेल.

  • काय आहे ही घटना?

नागपुरातील नंदनवन भागात असलेल्या आराधनानगर येथे विवेक पालटकर याने आपल्या पोटच्या मुलासह सख्खी बहीण, जावई, त्यांची आई व मुलगी अशा पाच जणांचा रविवारी मध्यरात्री बत्त्याने प्रहार करून निर्घृण खून केला. त्या घरात दुसऱ्या खोलीत झोपलेली आरोपीची एक मुलगी व जावयाची एक मुलगी अशा दोनच लहान मुली या खुनी हल्ल्यातून बचावल्या आहेत. रमण राघवला देखील लाज वाटावी अशा ह्या व्यक्तीचे विवेक पालटकर नाव असून खुनशी वृत्ती, आपलपोटेपणा, आळशी, संशयी अन् विश्वासघातकी असा हा विकृत माणूस आहे. पालटकरची मौदा तालुक्यातील नवरगावात १० एकर शेती आहे. ती कसण्याऐवजी आयते खाऊन तो गावात उनाडक्या करीत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी आठ वर्षांपूर्वी त्याचे लग्न लावून दिले.

लग्नानंतर जबाबदारी कळेल अन् तो सुधरेल, असा कुटुंबीयांचा भाबडा विश्वास होता. मात्र, झाले उलटेच, त्याने पत्नीला सविताला छळणे सुरू केले. पहिल्यांदा मुलगी झाली म्हणून छळ, तर नंतर पत्नी चारित्र्यहीन आहे, असे म्हणून तो छळू लागला. दरम्यान, पत्नीने गोंडस मुलाला जन्म दिला. तो मुलगाच आपला नाही, म्हणत पालटकरने सहा महिन्यानंतर २४ मे २०१४ ला पत्नीची हत्या केली अन् भर रस्त्यावरच तिला जाळून टाकले.

विवेकहीन पालटकरची बहीण अर्चना ही मीराबाई पवनकर यांची सून. सख्खा लहान भाऊ म्हणून पालटकर याच्यावर अर्चनाचा खूप जीव. तिचाच नव्हे तर तिचे पती कमलाकर पवनकर यांचाही मेहुण्यावर जीव होता. त्याचमुळे आई मीराबाईच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून कमलाकर यांनी चार वर्षांपूर्वी आईवडिलांच्या सावलीपासून पोरकी झालेली विवेकची मुलगी मिताली अन् मुलगा कृष्णा या चिमुकल्यांना आपल्या घरी आणले. त्यांना पोटच्या मुलांसारखे वाढवले. एवढेच काय, न्यायालयाने पालटकरच्या कृत्याबद्दल त्याला शिक्षा सुनावून कारागृहात डांबण्याचे आदेश दिल्यानंतर कमलाकर यांनी त्याला कारागृहातून बाहेर आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. अखेर तीन महिन्यांपूर्वी हा नराधम कारागृहाबाहेर आला. त्याच्या वृत्तीत सकारात्मक फरक पडण्याऐवजी तो जास्तच वाईट झाला

न्यायालयीन कामात खर्च झालेली पाच लाखांची रक्कम जावयाने परत मागितली असता तो खेकसू लागला. जावई कमलाकरच नव्हे तर बहीण अर्चनाशी तो उलटून बोलू लागला. त्यामुळे वृद्ध मीराबाईला तो जास्तच खटकू लागला. तो माणूस नाही, सैतान आहे. तो घात करेल, त्याला घरापासून दूरच ठेवा, असे त्या कमलाकर आणि सून अर्चनाला सांगू लागल्या. मात्र, त्यांच्या या सांगण्याला मुलगा आणि सुनेने कवडीची किंमत दिली नाही. उलट अर्चना आणि मीराबाई विसंवाद वाढला. त्यांच्यात विवेकच्या येण्या-जाण्यावरून नेहमी वाद होऊ लागले. रविवारी रात्री असेच झाले. क्रूरकर्मा पालटकरने कमलाकरच्या घरात पाय ठेवताच घरात कुरबूर सुरू झाली अन् अखेर पवनकर कुटुंबांतील चौघांना संपवूनच ही कटकट संपली. मीराबाईचे शब्द देखील खरे ठरले.

नागपूरचे हे हत्याकांड उजेडात येऊन १५ तासांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र, नराधम विवेक पालटकर घटनास्थळावरून कुठे आणि कसा पळला, ते स्पष्ट होऊ शकले नाही. त्याने आपली मोटरसायकल बहिणीच्या घरीच ठेवली. त्यामुळे तो कशाने पळाला, त्याला कुणी पळण्यासाठी मदत केली का, असे अनेक प्रश्न चर्चेला आले आहे. या प्रश्नांची उत्तरे नराधम पालटकरच्या अटकेनंतरच मिळणार आहेत.

प्रेमप्रकरणात अडथळा होत असल्याने प्रियकर व मामेभावाच्या मदतीने पतीला संपवले : महाराष्ट्रातील घटना

प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी स्वतःच्या पत्नी व बाळाची केली हत्या : महाराष्ट्रातील संतापजनक घटना

दोन मुलांची आई वीस वर्षीय बेरोजगार प्रियकराबरोबर झाली फरार : पोलिसांना केली ‘ ही ‘ मागणी

चार प्रियकरांच्या सोबत मिळून नवऱ्याला ठार करून गाठली क्रौर्याची परिसीमा : धक्कादायक बातमी

दोन्ही भावांनी बायकांना परपुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले : नकार देताच मिळाला तलाक

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

अश्लील चित्रफीत दाखवून मौलानाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार : महाराष्ट्रातील घटना

चुलत दिराकडून भावजयीवर तब्बल एक वर्षे अत्याचार : वाच्यता केल्यास द्यायचा ‘ ही ‘ धमकी

प्रेमविवाहासाठी धर्मांतर मात्र तरीही नव्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून :महाराष्ट्रातील घटना

अनैतिक संबंध बंद होत नसल्याने पत्नीने पतीला पेटवले: महाराष्ट्रातील घटना

प्रियकराच्या सोबत राहण्यासाठी ह्या बाईने जे केले ..विश्वास पण ठेवू शकणार नाही

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा