विवेक पालटकरने पाच जणांचे खून जादूटोण्यातून केले का ? : चौकशीत नवीन माहिती हाती

By | June 16, 2018

kamalakar pavankar murder case nagpur

नागपुरातील आराधनानगर येथील हत्याकांडामध्ये आणखी काही प्रकारची उकल होत असून ,पाच जणांची हत्या जादुटोण्यातून करण्यात आल्याचा देखील संशय आहे. पोलीस मारेकरी विवेक पालटकर याच्या घराचा शोध घेत होते. गुरुवारी त्याच्या घराची माहिती पोलिसांना मिळाली. चार महिन्यांपासून तो खरबीतील चामट लॉन परिसरात भाड्याने राहात होता. गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. पोलिसांना येथे जादुटोण्याचे साहित्य, मिर्ची, लिंबू, हळदी, कुंकू व कापलेले केस आढळले. त्यामुळे सामूहिक हत्याकांड जादुटोण्यातून तर घडले नाही ना ? , याची देखील शक्यता पोलीस पडताळून पाहत आहेत.

घटनेच्या चार दिवसानंतरही पाच जणांची हत्या करून पसार झालेल्या नराधम विवेक पालटकरबाबत अद्यापही स्मार्ट पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही. तो जडीबुटी विक्रेत्यांच्या संपर्कात होता. हत्याकांडानंतर ते जडीबुटीवाले देखील पसार झाले आहेत. विक्रेत्यांचाही जादुटोण्यावर विश्वास असतो. त्यामुळे विवेकच्या घरात आढळलेल्या साहित्याने जादुटोण्याच्या शक्यतेला बळ मिळत असल्याचे सांगण्यात येते. जडीबुडी विक्रेत्यांनी राजस्थानकडे पलायन केले आहे. पोलिसही त्यांच्या मागावर आहेत. याशिवाय विवेक हा मध्य प्रदेशातील एका व्यक्तीच्याही संपर्कात होता, असे तपासादरम्यान उघडकीस आल्याने पोलिसांचे पथक मध्य प्रदेशलाही रवाना झाले आहे. पोलिस सर्वच दिशेने तपास करीत असले तरी अद्यापही पोलिसांना विवेक याच्याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. सोमवारी पहाटे विवेक याने जावाई कमलाकर पवनकर, बहीण अर्चना, कमलाकर यांची मुलगी वेदांती, आई मीराबाई पवनकर व स्वत:चा मुलगा कृष्णाची निर्घृण हत्या केली होती. एकाच वेळी एकाच कुटुंबातील पाच जणांच्या हत्येची नागपुरातील ही पहिलीच घटना असल्याने पोलिसांमध्येही प्रचंड खळबळ उडाली होती.

ह्या हत्याकांडामध्ये विवेक पालटकरने स्वतःच्या एका मुलीचा देखील खून केला होता तर त्याची वाचलेली मुलगी , वैष्णवीला वागविण्यास कोणीही तयार नसल्याने तिला काटोल मार्गावरील शासकीय मुलींचे वसतिगृह व सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.