शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

By | January 5, 2018

jignesh mevani fake popularity & sponsorships by outside countries

जिग्नेश मेवानी यांच्या भाषणासाठी पार लोक रस्त्यावर आले आणि जेलमध्ये गेले हा निव्वळ खोटा देखावा जाणीवपूर्वक तयार केला जातोय. फुकटच्या पब्लीसिटीला हपापलेले लोक आणि पैसे देऊन विकत घेतलेली यंत्रणा देशद्रोही शक्तीकडून फक्त मोदींना ( म्हणजे फक्त पूर्ण बहुमतातल्या सरकारला,त्यांना फरक पडत नाही मोदी असो वा इतर ) विरोध म्हणून तयार केल्या जात आहेत .भाजपची एकहाती असलेली सत्ता विदेशी लोकांच्या डोळ्यात खुपत आहे. आणि याआधी बोललो तसेच होत आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाचे खापर सरकार व यंत्रणेवर फोडून आपण नामानिराळे. आता आपणच शोषित आहोत, आपल्यावर कसा अन्याय झालाय याचा डांगोरा पिटवत जिग्नेश आणि उमर देशभर फिरत राहणार. मोदिनी ह्या विषयावर बोलावे असे आवाहन करत राहणार, आणि बोलले मोदी तर ह्या प्रश्नाला बगल दिली तसेच ह्या विषयावर बोललेच नाही असे म्हणायला मोकळे .आता मोदी काय यांना विचारून बोलणार का ? ते कुठे आपण कुठे ? थोडे तरी निदान त्यांच्या पदाचे तरी भान ठेवा . काय तर म्हणे आम्हाला भाषण करून दिले नाही. फेसबुक येत ना वापरता ? युट्युब आहे ना ? असेल चालवता येत असेल तर बनवायचा एक व्हिडिओ आणि द्यायचा अपलोड करून. जिओचे कार्ड आहे का ? का पाठवू इथून ( आणि हो ही अंबानीची कंपनी आहे बर का )

फक्त तुमचे भाषण ऐकण्यासाठी कोण जीवावर उदार होऊन आल्याचे खोटे तरी लोकांच्या पुढे मांडू नका.तुमच्यापेक्षा जास्त लोक इथ सनीला पाहायला जमतात त्यामुळे जमल्या गर्दीचे उदाहरण देऊन काय पण बरळू नका. इतके काय तुम्ही भारी भाषण देता राव ,का लोक पार जीवावर उदार होऊन येतात म्हणजे निदान तस पुण्यातल्या भाषणात चिथावणी पलीकडे कुठे काही दिसलं नाही .मोदीविरोध हाच फक्त अजेंडा. रिपब्लिक चॅनेलच्या रिपोर्टरला रिपोर्टिंग करू देत नव्हते काल ? हीच का तुमची लोकशाही . पत्रकार लोकांना तुमच्या कार्यक्रमाचे रिपोर्टिंग करायला देखील बंदी खालून काल तुम्ही दाखवून दिले तुमचा बोलविता धनी कोण आहे ते ? मुळात तुम्हाला लोकशाहीच नको आहे असे असते तर चॅनेल वाल्याना बंदी घातली नसती.

नौटंकीची सवय आहेच, आणले ४ अभिनेते , अटक केल्याचा एक इव्हेन्ट केला आणि म्हणे मला कोणी बोलूच देईना. काय धरून ठेवले होते का ? कि तोंडाला चिकट पट्टी लावून बसवले होते. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे गुजरात नाही. आम्हाला परकीय आक्रमणे जास्त चांगली कळतात. डोकलामवेळी राहुल गांधी चीनी लोकांना भेटले होते. पुढे तुमची त्यांची भेट झाली आणि तुम्ही दोस्त झाले. गुजरातमध्ये दोघे बरोबर लढले ना ? काय फरक पडला जास्त. सत्तेत तर भाजपच राहिली ना ? मात्र गिरे तो भी टांग उपर ही प्रवृत्ती काही जात नव्हती, म्हणजे काय तर सीट कमी झाले ते पण आमच्यामुळेच. वऱ्हाड निघालाय लंडनला गुजराथीमध्ये पाहिलं असेल तर त्यात आहे एक, हरबरा टरारा वर आला तो पण माझ्यामुळेच. तसच काहीस तुमच झालाय.

फक्त मोदी विरोध नाही तर देश व संविधानला विरोध हेच तुमचे पहिले तत्व आहे .तुमची क्लीप पहिली त्यात तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले ते देखील काय काळ्या दगडावरची रेष नाही असे म्हटले आहे .आज ज्या संविधानच्या आधारे देश चालतो ते देखील तुमच्या नजरेतून सुप्रीम नाही तर दोष लोकांमध्ये नाही तुमच्या व्यक्तीमत्वात आहे. गुजरातच्या वेळी तुमचे सहकारी .सॉरी सवंगडी म्हणेल हव तर कारण सहकारी मोठ्या वयाचे असतात . (बर झाल अजून एक विचारायचे राहिले, ते जेएनयू मध्ये असे काय देतात हो पोरांना म्हणजे तिथली पोर आयुष्यभर विद्यार्थी दशेतच राहतात , ते देखील सांगितलं बर होईल . म्हणजे ३०-४० वर्षांची पोर पण विद्यार्थी दशेतच ) . गुजरातमध्ये राहुल गांधीच्या वतीने सांगितले गेले. मी जानवेधारी हिंदू आहे. राहुल गांधी यांचे टेम्पल रन करून झाले पण हाती आले काय ?.देश वैतागला आहे हो ह्या गोष्टीला , एकाच हार्ड हिंदुत्व दुसऱ्याच सॉफ्ट हिंदुत्व .. आमचा फक्त राष्ट्रीयत्व आहे .. तुम्ही सॉफ्ट हार्ड खेळत बसा . मी काही १ टक्का पण भाजपचा समर्थक नाही ना कधी त्या संघाची पायरी चढलोय, पण हे जे काय तुम्ही चालवलाय ते पाहून लाज वाटते हो .

गेली कित्येक वर्षे हीच नौटंकी पाहत आलो आहोत. आता नको ते जाती पातीवरचे राजकारण आम्हाला. जातीयवाद संपवायचा तुम्ही वाढवताय. तुम्ही बोललात रस्त्यावर या, लढा आणि न्याय मिळवा . न्याय कसला ते तरी सांगा ? निदान रस्त्यावर येऊन करायचे काय ? भाजी विकायची कि दंगल घडवायची . केवळ मोदींना विरोध म्हणून काय पण बरळत राहायचे. काहीतरी विधायक कार्यक्रम द्या . दोन लोकांना एखादा चांगला रोजगार तरी सुचवा, सुचवा मुद्दाम म्हणतोय कारण मोदी विरोधापायी तुमचेच तुमच्या व्यवसायाकडे लक्ष नाही . निदान तुम्ही सुचवले तरी आम्ही करू शकतो, तुम्ही शिवराळ राजकारण करत राहा. दलित लोकांना न्याय द्यायला यंत्रणा आहे, लोकशाही आहे कृपया आपण इथे येऊन महाराष्ट्रात वातावरण खराब करू नये ही विनंती. मायावतींनी टक्कर मारून झाली एकदा महाराष्ट्रात, आल्या पावली परत गेल्या . जातीपाती संपल्या पाहिजे म्हणत १० जातींची नावे पुण्यात घेऊन झाली. काहीतरी पॉजिटीव्ह निदान बोलत तरी जा .

  • हिंदू मुस्लीम बांधवाना एक नम्र आवाहन

हिंदू दलित यांचा गेम खेळून झालाय. त्यात दुर्दैवाने आपण हरलो असे म्हणावे लागेल. पुढील निशाणा तुमच्यावर आहे. पुढे कदाचित हिंदू-मुस्लिम दंगे भडकवतील.देशाच्या संपत्तीचे नुकसान घडवून आणतील. यामागचे हात कदाचित आपल्याला कळणार पण नाहीत. धर्मासाठी म्हणून शासकीय यंत्रणेला आणि देशाला त्रास देण्याचे पाप आपल्याकडून करून घेतले जाईल, जे कोरेगाव प्रकरणात झाले. नाव उमर असो वा कमर त्याने काही फरक पडत नाही, अशांचा एकच धर्म असतो तो म्हणजे पैसा,देश नव्हे . निधर्मी वगैरे फक्त बोलायची भाषा झाली. नाव उमर आहे म्हणून आपल्या बाजूचा असा गैरसमज चुकून करू घेऊ नका . नावात काय नसते असे असते तर इस्लामिक देशात हजारो मुस्लीम मेले नसते .ह्यापेक्षा ओवेसी १० पट बरे ,पाकिस्तानला जाऊन सुनावून आले. जिग्नेश उमर व सहकारी हे फक्त निधर्मी नाहीत तर फक्त पैशाच्या पाठीचे लोक आहेत. घटनेने प्रत्येकाला स्वतंत्र विचाराचा अधिकार दिलेला आहे. मात्र ह्या लोकांपासून लांब राहा. महाराष्ट्रात आणि देशात सरकार विरोधी लाट बाहेरच्या शक्तींकडून आपल्याच लोकांच्या माध्यमांतून तयार करवून घेतली जात आहे ,वरून देशभक्त आणि लोकशाहीवादाचा आव जरी आणत असले तरी यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. देशात अस्थिरताच राहावी आणि १३-१५ पक्षाचे लंगडे सरकार राहावे. जागतिक पातळीवर आपले अस्तित्व सिद्ध करण्याची भारताला संधीच मिळू नये यासाठी सरकारला आपली शक्ती व वेळ देशातच खर्च करावा लागावा म्हणून हे सगळे चालू आहे . जात धर्म आणि भाषा यावर देश तोडू नका .. जय हिंद .. वंदे मातरम.

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

अखेर मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणावर नाव न घेता केला ‘ ह्यांचे ‘ कडे इशारा

२०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ? : वाद का तयार झाला

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा