‘ इथे ‘ रचला गेला जामखेड हत्याकांडाचा कट : जामखेड दुहेरी हत्याकांड

By | May 1, 2018

again double murder in jamkhed

जामखेड येथील उल्हास माने याच्या तालमीत दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याचे समोर आले आहे . हत्याकांड घडल्यानंतर मुख्य मारेकरी गोविंद गायकवाड व माने यांचा फोन देखील झाल्याचे स्पष्ट झाले आहेत .

उल्हास माने, फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत . जामखेड शहरामध्ये ( जामखेड हा नगर जिल्ह्यातील तालुका आहे ) उल्हास माने हा शिवशंकर नावाची तालीम चालवतो . गोविंद गायकवाड हा त्या तालमीचा प्रमुख म्हणून काम पाहतो . शनिवारी हत्याकांडाची घटना घडल्यानंतर गायकवाड व माने यांच्यात फोन झाला आहे . पोलीस माने याच्या तालिमीवर गेले तेव्हा तिथे कोणीच नव्हते व सगळे पैलवान फरार झालेले होते . पोलिसांनी उल्हास माने याचा भाऊ, कैलास व प्रकाश यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे .

मयत योगेश राळेभात याचा माने याच्या तालमीतील गायकवाड व इतर पैलवानांसोबत एक वर्षांपूर्वी वाकी ( ता. जामखेड ) इथे फ्लेक्स बोर्ड लावण्यावरून वाद झाला होता . याच वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे . फिर्यादीत देखील याच वादाचा संदर्भ आलेला आहे . हत्याकांड झाल्यानंतर लगेचच उल्हास माने हा फरार झाल्याने सध्या शिवशंकर तालीम व व पैलवानांच्या तपासासाठी पोलिसांनी १५ पथकांची नेमणूक केलेली आहे .उल्हास माने हा आतून भाजपचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे व त्याला राजकीय पाठबळ देखील आहे अशी प्राथमिक माहिती आहे .

  • काय आहे पूर्ण बातमी

नगरमधील केडगावातील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण ताजे असतानाच शनिवारी (ता.२८ एप्रिल २०१८) ला जामखेड (जि .नगर )मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन तरुण कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन कार्यकर्त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय 30 वर्ष) आणि कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.

योगेश राळेभात व राकेश राळेभात हे दोघे दुकानासमोर बसलेले असताना संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून तीन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यांनी गावठी कट्ट्यातून योगेश व राकेश यांच्यावर लागोपाठ 8 गोळ्या झाडल्या. त्यानंतर तीनही हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडल्यामुळे जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला . याआधी देखील नगरजवळील केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती . त्याचा तपास चालू असतानाच ही दुसरी दुर्दैवी घटना घडली .

दरम्यान, स्थानिकांनी दोघांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. परंतु वैद्यकीय अधिकारी गायब असल्याने योगेश व राकेशला उपचाराअभावी अर्धा तास तसेच ठेवावे लागले.अर्ध्या तासाने वैद्यकीय अधीक्षक सी. व्ही. लामतुरे आल्यानंतर प्राथमिक उपचार करून जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र,तोवर ते मृत झाले होते .

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राम शिंदे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकांचा संताप पाहून राम शिंदे यांनी तेथून काढता पाय घेऊन जावे लागले होते. हळूहळू ह्या हत्याकांडाचे धागेदोरे स्पष्ट होत असून, हत्याकांडातील मुख्य आरोपी हे भाजपचेच कार्यकर्ते आणि पालकमंत्री व राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या जवळचे असल्याची प्राथमिक माहिती आहे . त्यामुळेच राम शिंदे यांना नगरच्या जिल्ह्या रुग्णालयामध्ये भेटायला आले असताना नागरिकांच्या प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले होते . जमावाने अक्षरश: राम शिंदे यांना कोंडून घेतले होते व शेवटी पोलिसांच्या मदतीने राम शिंदे यांना पळ काढावा लागला होता .

‘ ह्या ‘ कारणावरून नगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती : जामखेड दुहेरी हत्याकांड

‘ ह्या ‘ कारणाने राज्याच्या जलसंधारण मंत्र्यावर पोलिसांच्या मदतीने पळून जाण्याची वेळ : पूर्ण बातमी

नगरमध्ये पुन्हा दुहेरी हत्याकांड, जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या :सविस्तर बातमी

नगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले ? शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

केडगावचा नगरसेवक विशाल कोतकरने ‘असा ‘ सांगितला घटनाक्रम : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

बाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय ?: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्या पेट्रोल पंपावर कोणाचा होता डोळा ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा