उत्तर कोरियानंतर आता ‘ह्या ‘ देशानेही दिलं अमेरिकेला आव्हान

By | September 23, 2017

iran vs america

अमेरिकेच्या महासत्तेच्या ग्रहण लागलाय का ? डोनाल्ड ट्रम्प यांचा पायगुण अमेरिकेला अपशकुनी ठरलाय का ? या आधी फक्त उत्तर कोरिया अमेरिकेला अजिबात मोजत नव्हता,आता दुस-या बाजूला इराणनेही अमेरिकेला खुलं आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.

इराणने शनिवारी अमेरिकेचा इशारा धुडकावून लावत नवीन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. इराणने खोरामशहर हे नवीन क्षेपणास्त्र विकसित केले असून, तिथल्या सरकारी वाहिनीवर या क्षेपणास्त्र चाचणीची व्हिडीओ दाखवण्यात आला.

इराणने मागच्यावर्षी आपला अण्वस्त्रे विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम नियंत्रणात ठेवण्याचा ऐतिहासिक करार केला होता ,त्याबदल्यात अमेरिका आणि युरोपियन युनियनने त्यांच्यावरील तेलाचे आणि आर्थिक निर्बंध मागे घेतले होते.

यापूर्वीदेखील इराणने क्षेपणास्त्र चाचणी केल्यानंतर त्यांच्यावर अनेक निर्बंध टाकण्यात आले होते. अखेर अतिशय कठोर आणि झोंबणारे निर्बंध मागे घेतल्यानंतर इराणची १०० अब्ज अमेरिकन डॉलर किमतीची अडकवून ठेवलेली मालमत्ताही खुली करण्यात आली होती पुढेही इराणने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम असाच सुरु ठेवला तर, त्यांच्यावर आणखी निर्बंध येऊ शकतात.

इराणने आपला अणुकार्यक्रम हा शांततेसाठीच असल्याचा दावा ह्या वेळी देखील केला आहे .

? पोस्ट आवडली तर लाईक करा…. शेअर करा ?