दोन्ही भावांनी बायकांना परपुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले : नकार देताच मिळाला तलाक

By | May 7, 2018

ipl satta crime news

परपुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानं दोन भावांनी त्यांच्या पत्नींना तलाक दिलाय. उत्तर प्रदेश मधील शामली जिल्ह्यातील झिंझाना भागात राहणाऱ्या दोन भावांनी क्रिकेटवर सट्टा लावला होता. त्यातून झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ह्या दोन नराधम भावांनी चक्क त्यांच्या बायकांना पर पुरुषांशी संबंध ठेवायला सांगितले आणि त्यांनी नकार दिला असता दोन्ही भावांनी त्यांच्या पत्नींना तलाक दिला. शनिवारी दोन्ही महिलांनी याबद्दलची तक्रार पोलीस अधिक्षकांकडे केली आहे . वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल आरोपींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले असून पोलीस ह्या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत .

विशेष म्हणजे , तलाक देण्यात आलेल्या महिला सख्ख्या बहिणी असून त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. चैसाना येथे राहणाऱ्या या दोघींचा निकाह आठ महिन्यांपूर्वी सहारणपूर जिल्ह्याच्या नकुडमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांशी झाला. धुमधडाक्यात लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना ह्या भावांचे खरे स्वरूप उघड झाले . त्यांना क्रिकेटवर सट्टा लावायची सवय होती आणि त्यातूनच त्यांच्यावर मोठे कर्ज झाले व परतफेड करायला या भावांकडे कोणताच मार्ग नसल्याने शेवटी ही दुर्दैवी वेळ महिलांवर आली .पतींनी तलाक दिल्यानंतर या दोघींनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्लोक कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली. ‘दोघांचे पती सख्खे भाऊ असून त्यांना क्रिकेटवर सट्टा लावायची सवय आहे,’ असं दोघींनी तक्रारीत म्हटलंय.

पंधरा दिवसांपूर्वी दोन्ही भावांचं आयपीएल सट्ट्यात दोन लाख रुपयांचं नुकसान झालं. सट्टा जिंकलेल्या लोकांनी या पैशांसाठी दोघांकडे तगादा लावला. सट्टा हरल्यामुळे यांच्याकडे ह्या पैशाची परतफेड कशी करायची हा प्रश्न होता. त्यावेळी समोरील व्यक्तीने या पैशांची परतफेड करायची नसल्यास दोघांच्या पत्नींसोबत शारीरिक संबंध ठेऊ देण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर दोन्ही भावांनी त्यांच्या पत्नींना त्या व्यक्तींशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. मात्र दोन्ही बहिणींनी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. यानंतर दोन्ही भावांनी 10 एप्रिलला त्यांच्या पत्नींना तलाक दिला. माणुसकीला काळिंबा फासणारे हे प्रकरण उत्तर प्रदेश मधील असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत .

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

भोंदूबाबा हैदरअली शेखवर बलात्काराचा आणखी एक गुन्हा: केला विकृतीचा कळस

अश्लील चित्रफीत दाखवून मौलानाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार : महाराष्ट्रातील घटना

रक्ताच्या बदल्यात मागितले शरीरसुख : महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

चुलत दिराकडून भावजयीवर तब्बल एक वर्षे अत्याचार : वाच्यता केल्यास द्यायचा ‘ ही ‘ धमकी

प्रेमविवाहासाठी धर्मांतर मात्र तरीही नव्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून :महाराष्ट्रातील घटना

अनैतिक संबंध बंद होत नसल्याने पत्नीने पतीला पेटवले: महाराष्ट्रातील घटना

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

प्रियकराच्या सोबत राहण्यासाठी ह्या बाईने जे केले ..विश्वास पण ठेवू शकणार नाही

पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमप्रकरणाला कंटाळून पतीची आत्महत्या : सुसाईड नोटमध्ये लिहले असे काही ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा