परत एकदा पाकिस्तानमध्ये घुसून भारताचा सर्जिकल स्ट्राईक : ४ पाकडे यमसदनी

By | December 26, 2017

indian army surgical strike in ravalkot 4 pakistani soldiers killed

पाकिस्तानी सैन्याच्या नापाकअशा हल्ल्यामध्ये भारताचे तीन जवान शहिद झाले होते. ह्याचा वचपा काढत भारतीय लष्कराने तात्काळ कारवाई करत पाकिस्तान व्याप्त काश्मीर मध्ये सोमवारी रात्री हल्ला चढवत तब्बल चार पाकिस्तानी सैनिकास यमसदनी धाडले . ही कारवाई पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट सेक्टरमध्ये करण्यात आली. रात्रीच्या सुमारास काही भारतीय सैनिक पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या हद्दीमध्ये घुसले आणि अचानक हल्लाबोल गेला. अचानक अनपेक्षित असलेल्या हल्ल्याने पाकिस्तानी सैनिक सैरभैर झाले आणि त्यात ४ जणांना यमसदनी पोहचवून भारताने आधीच्या हल्ल्याचा बदला घेतला .

शनिवारी भेकडपने पाकिस्तानने गोळीबार सुरु केला होता, त्यात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाले होते. भारतातमधून याबद्दल मोठा आक्रोश होता. ह्या नापाक हल्ल्याचा वचपा काढावा अशी समस्त भारतीयांची मनापासून इच्छा होती.ही भारतीयांची इच्छा आपल्या सैन्याने पूर्ण केली. भारत या कारवाईला सर्जिकल स्ट्राईकचे नाव देत नसला तरी ही कारवाई सर्जिकल स्ट्राईक सारखीच होती. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार लष्कराने या कारवाईत अनेक पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्याचे समजते.

भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोटके पेरुन पाकिस्तानी सैनिकांना जाळयात अडकवण्याचा ट्रॅप रचला होता. त्यानंतर लाईट मशिनगमधून फायरिंग केली त्यात चार सैनिक ठार झाले. जवळपास 45 मिनिटे ही कारवाई सुरु होती असे वृत्त इंडियाने टुडेने दिलेले आहे. स्थानिक कमांडरने परिस्थितीनुसार थेट पीओकेमध्ये घुसून ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला असे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई पाकिस्तानसाठी एक इशारा आहे. यापुढे पाकिस्तानने भारतीय जवानांवर असे भेकड हल्ले केले तर या पेक्षा देखील अधिक मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल असे सैन्याकडून सांगितले गेले आहे.

भारतीय सैन्य नियंत्रण रेषा ओलांडून अर्धा किलोमीटर पर्यंत आत घुसले होते. मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाल्यानंतर लावकाचं याचा बदल घेऊ असे भारताने सांगितले होते. काळ व वेळ आम्ही ठरवू असे सांगितले होते. त्यानुसारच सोमवारी रात्री मोठ्या स्वरूपात ही कारवाई केली गेली.

शनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात एक मेजर आणि दोन जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने आम्ही या नापाक कारवाईला उत्तर देऊ. वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू असे स्पष्ट केले होते. भारतीय लष्कराच्या या कारवाईत चार पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची शक्यता आहे.पाकिस्तानी माध्यमे मात्र कुलभूषण जाधव याच्या आई व पत्नी यांनी पाकिस्तान सोडले व लगेच भारताने हल्ला केला अशी ओरड करत असून, त्यांनी देखील ह्या हल्ल्यास दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानच्या घरावर हिंदुस्थान जिंदाबाद आणि सारे जहाँसे अच्छा : काय आहे प्रकरण ?

ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

डेटा चोरीच्या आरोपाखाली यूसी ब्राऊजर ला दाखवला गुगलने बाहेरचा रस्ता

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?