मनात आणले तर २४ तासात मुख्यमंत्री बदलू शकतो : शिवसेनेचे प्रतिआव्हान

By | October 28, 2017

if we decide we can change maharashtra chief minister

तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी भाजप आणि शिवसेनेची परिस्थिती आहे . मात्र मध्यवर्ती निवडणुका सध्या कोणालाच परवडणाऱ्या नसल्याने राज्याचा गाडा दोघे मिळून ओढताहेत असे साधारण चित्र आहे . एकमेकांवर टीका केल्याशिवाय दोन्ही पक्षाचा एकही दिवस जात नाही. मात्र अच्छे दिन येण्याच्या आशेवर बसलेल्या लोकांचे यामुळे चांगले मनोरंजन करण्याचे काम दोन्ही पक्ष करत आहेत.

सरकारला तीन वर्ष झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, जर मनात आणले तर २४ तासात मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसवू शकतो, असे विधान करत शिवसेनेला चिमटा काढला होता. शिवसेनेने देखील यावर आक्रमक होत , आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो. शिवसेनेची ताकद अजमावू नका. असा इशारा भाजपला पर्यायाने मुख्यमंत्र्यांना शिवसेनेने दिलाय.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पत्रकारांशी कोल्हापूर येथे बोलत होते. त्यावेळी हा इशारा त्यांनी भाजपला दिलाय. मुंबई महापालिकेचा महापौर बदलून भाजपचा करणे अवघड नाही हे विधान मुख्यमंत्रीपदाला शोभणारे नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाबाबत, अच्छे दिन कसे येतील या नियोजनाबाबत आणि सीमाभागातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत बोलावे. मुंबईचा महापौर बदलू असे ते म्हणत असतील, तर त्यांचा हेतू शुद्ध नाही, असे ते पुढे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर मुंबईचा महापौर बदलण्याची भाषा करत असतील, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनात आणले तर सात दिवसांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील बदलू शकतात, असा इशारा विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा महापौर बदलण्याची भाषा करण्यापेक्षा राज्याच्या विकासाचा विचार केला, तर बरे होईल. त्यांनी अच्छे दिनचा विचार करावा.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा नगरसेवकांना पक्षात घेताना कोणता फॉर्म्युला वापरला, असे प्रश्‍न शिवसेनेला विचारले जात आहे तर मग भाजपने काय केले. भाजपने उत्तराखंड, गोवा तसेच इतर राज्यांत दुसर्‍या पक्षातील आमदार पक्षात घेताना कोणता फॉर्म्युला वापरला, हे देखील जाहीर करावे असे आव्हान त्यांनी भाजपला दिले आहे .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply