#विनोदी_लेख : तैमूरला राष्ट्रीय बाळ घोषित केले तर राजकारणी काय प्रतिक्रिया देतील ?

By | January 10, 2018

if taimur declared as national kid how politicians will react

(विनोद म्हणून लिहलेला आहे, कोणाच्या भावना दुखवायच्या म्हणून नाही. इतकासा विनोद सहन करण्याइतके आपले मोठे मन आहे याची खात्री बाळगून )

आज सकाळी सकाळी पेपर हातात घेतला .. म्हटलं बघूयात काय चाललंय तर .. हेडलाईनवर बातमी होती तैमूरला राष्ट्रीय बाळ घोषित केल्याची .. टी.व्ही. सुरु केला तर टी.व्ही. वर काय बातमी नव्हती , म्हणून टी.व्ही. म्यूट केला आणि पेपर वाचायला सुरु केला .खरे वाटेना पण पूर्ण बातमी वाचली आणि खात्री पटली कि तैमूर हा आता राष्ट्रीय बाळ झालेला आहे . तैमूर नाव ठेवल्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या मात्र नेत्यांनी ह्या विषयावर बोलण्याचे टाळले होते . बहुदा नाव काय ठेवायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून बहुदा शांत असतील. पण आता राष्ट्रीय बाळ घोषित झाल्यावर हा विषय देशाशी संबंधित झाला आणि मग काय, प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने प्रतिक्रिया द्यायला सुरु केले, अर्थात ह्या प्रतिक्रिया छापून आलेल्या होत्या . टी.व्ही. म्यूट होता आणि मी पेपर वाचण्यात मग्न होतो .

नरेंद्र मोदी : हम सब जानते है की एक तैमूर हिंदुस्तान को लूट कर ले गया था. लेकिन यह बेटा विदेश जाकर देश का नाम रोशन करके आएगा।

राज ठाकरे : कोणी मराठी नाही मिळाला का ? तिथे पण अमराठी. जिथे तिथे अमराठी लोकांची वर्दी लावून टाकलीय ह्या दिल्लीतल्या लोकांनी. केवळ महाराष्ट्रात राहता म्हणून मराठी नाही तर जो मराठी बोलतो तो मराठी. जिथे त्या तैमूरला राष्ट्रीय बाळ म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे तिथे माझे सैनिक त्यास विरोध करणार .

उद्धव ठाकरे : नाव तैमूर असो इतर काही, त्याने काय फरक पडतो असे मानायला असे आमचे संस्कार नाहीत . हिंदुस्तानात जन्मलेला मग तो जातीने धर्माने कोणीही असो, भारत भूमीवर जो प्रेम करतो तो भारतीय आणि सच्चा शिवसैनिक. नावाशी आम्हाला काही घेणे देणे नाही, मात्र आम्हाला विश्वासात न घेता हा जो निर्णय सरकारने घेतला आहे, त्याला आमचा विरोध आहे .जर सरकारने तैमूरला राष्ट्रीय बाळ म्हणून पुरस्कार दिला तर आमचे मंत्री सामूहिक राजीनामा देतील आणि सत्तेला लाथ मारत आम्ही सत्तेतून बाहेर पडू, आणि तुम्हाला तर माहित आहेच राजीनामे आमच्या खिशात असतात .

रामदास आठवले : त्याचे नाव तैमूर जरी असले तरी तो भारत भूमीमध्ये जन्माला आला आहे आणि त्याला पुरस्कार मिळाला म्हणून आम्ही त्याचे अभिनंदन करतो, लवकरच आमच्या पक्षातर्फे देखील आम्ही त्याचा सत्कार करू. मोदी सरकारने कोणताही दुजाभाव मनामध्ये न ठेवता त्याला हा पुरस्कार दिला आहे म्हणून आम्ही त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो .

  • संबधित बातम्या

बसल्या जागी मोबाईलला आधार कार्ड करा लिंक : ‘ ह्या ‘ सोप्या पद्धतीने

गोव्यामध्ये चक्क ‘ ह्या ‘ गोष्टीसाठी देखील होती आहे आधार कार्डची मागणी

गोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..’ ह्या ‘ गोष्टीला केली सुरुवात

अजित पवार : चांगली गोष्ट आहे .. त्याबद्दल त्याचे व त्याच्या कुटुंबीयाचे अभिनंदन.

देवेंद्र फडणवीस : केंद्र सरकारकडून हा एक अत्यंत चांगला असा हा निर्णय घेण्यात आलाय . महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारा असा हा निर्णय असून याचे दूरगामी परिणाम खूप चांगले राहणार आहे . महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे नक्की काय परिमाण होतील याचा सध्या अभ्यास चालू आहे.

लालूप्रसाद यादव : हम अभी जेल मा है . हमको भी यह खबर का पता चला मगर थोड़ा देर से मालूम हुआ। अगर यह पुरस्कार देना ही था तो हमर बीटा तेजप्रताप में का खराबी थी ? वो तो बोलता भी है। पर हमको पता है की यह ना इंसाफ़ी हमरे बेटे का साथ क्यों हुयी है ? यह पुरे बिहार का अपमान है. पुरे बिहार का अपमान करने का घोर पाप मोदी और अमित साह ने किया है, और बिहार की जनता इसको एलेक्सन में जरूर जबाब देगी।

मायावती : मैं फिलहाल उत्तर प्रदेस में हु. . जब मुझ यह पता चला तो मैंने मेरे सहकारी लोगो से बात की, पूरी तसली होने के बाद फिर मैं आपके सामने आके यह कह रही हु , इसके पीछे जरुर लोकतंत्र विरोधी मनुवादी शक्तियों का हाथ है , मैं और मेरी पार्टी मनुवादी शक्तियोंके खिलाफ मरते दम तक लड़ेंगे।

अरविन्द केजरीवाल : चलिए,यह सरकार ऐसे भी कुछ करती है यह सुनकर अच्छा लगा ,क्योंकि हमको तो लगता था की यह सरकार सिर्फ सर्जिकल स्ट्राइक ही करती है, और जिसका कोई प्रूफ नहीं देती। हमारी शुभकामना है इस तैमूर बेटे के साथ , मगर इसमें जरूर कुछ लेन देन हुआ है जिसकी निपक्ष जाँच होनी चाहिए| और अगली बार जब भी इस पुरस्कार के लिए चुनने का वक़्त आये तो उसमे जनता को भी शामिल किया जाना चाहिये

ओवेसी : यह बहुत खुशी कि बात है कि सरकारने इसको चुनने मी कोई सांप्रदायिक सोच का प्रदर्शन नहीं किया। हमारी दुआ है बेटे और उसके फॅमिली के साथ

राहुल गाँधी : यह बहुत ख़ुशी की बात है की तैमूर को राष्ट्रीय बेटा घोषित कर दिया, लेकिन अगर उसकी जगह मतलब आमिर की जगह कोई गरीब घर के बेटे को चुना जाता तो मुझे अधिक संतोष होता | लेकिन इस सरकार से ऐसी उम्मीद नहीं की जा सकती क्योंकि यह सिर्फ उद्योगपतियों की सरकार है

संजय निरुपम : हमारे नेताजी ने जो कहा बिलकुल सही कहा है , उसमे मुझे कोई आपत्ति नहीं है। अब तैमूर मुंबई का है तो हमारे लिए यह काफी ख़ुशी की बात है और उसको यह पुरस्कार देते वक़्त अगर मनसे की तरफ से कुछ गलत हरकत की गयी तो हमारे कांग्रेस के युवा लोग तैमूर के बचाव के लिए रस्ते पर उतरेंगे। .

हे सर्व वाचत असताना टी.व्ही कडे नजर गेली तर बातमी आलेली होती. करीना ,सैफ आणि तैमूर नॉर्वेला सुट्टीसाठी रवाना …#बसा_भांडत

(लेखन आवडले असेल तर लाईक करा शेअर करा. आपल्या मिमिक्रीसाठी वेबसाईट (www.marathipeople.co.in) चा उल्लेख करून वापरू शकता )

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत लपवलेली ‘ ही ‘ गोष्ट तुमच्या लक्षात आली का ?

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा