आजपर्यंत साधी चिमणी मारली नाही, ‘ त्या ‘ वादग्रस्त व्हिडिओवर गिरीष महाजन यांचे स्पष्टीकरण

By | November 28, 2017

i am vegetarian never killed a single sparrow girsh mahajan

चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी सोमवारी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी बंदूक घेत वनविभागाच्या शोधमोहिमेत सहभाग घेतला होता . त्यावेळी गिरीष महाजन बंदूक घेऊन बिबट्याच्या मागे धावलायचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यावर नेटिझन्स कडून मोठ्या प्रमाणात गिरीष महाजन यांच्यावर टीका करण्यात आली होती. अखेर गिरीष महाजन यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले , ‘मी स्वतःहा शाकाहारी असून आजपर्यंत एक चिमणीसुद्धा मारली नाही. बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना रस्त्यात अचानक बिबट्या आल्याचा आरडाओरडा सुरू झाला. लोकांची आणि प्राण्यांची पळापळ सुरू झाली. त्यामुळे मी इतर अधिकाऱ्यांसह गाडीतून उतरलो. जर मी तिथली परिस्थिती पाहूनही गाडीत बसून राहीलो असतो तर मंत्री गाडीतून उतरलेही नाहीत, अशी ओरड झाली असती, लपून राहणं हा माझा स्वभाव नाहीच, म्हणून मी गाडीतून उतरून परिस्थितीला सामोरं गेलो. लोकांची सुरक्षा व्हावी हा माझा उद्देश होता म्हणूनच खाली उतरलो. त्यामागे बिबट्याची शिकार करणं हा माझा अजिबात हेतू नव्हता. कुठलीही स्टंटबाजी मी केली नाही, असं स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे.

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावासह आजूबाजूच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते.वरखेडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या दीपाली जगताप व सुसाबाई भिल्ल यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेण्यासाठी वरखेडे येथे गेले होते.बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे तळ वाढविण्यात येतील व गरज पडल्यास मी २-३ दिवस या भागात तळ ठोकेन, असं आश्वासनही मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं.

चाळीसगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने पशू, पक्षी यांच्यासह महिला, मुले यांचे बळी घेतले आहे. आतापर्यंत जवळपास पाच जणांचा बळी या बिबट्याने घेतला आहे, तर ह्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये १२ ते १३ जण जखमी झाले आहेत.त्यामुळे नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी सोमवारी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी बंदूक घेत वनविभागाच्या शोधमोहिमेत सहभाग घेतला होता. ते गाडीतून जात असताना अचानक बिबट्या आला असा आरडाओरडा सुरु झाला त्याने एकच गोंधळ उडाला व त्यावेळी गिरीश महाजन गाडीतून उतरले आणि नेटिझन्सच्या टीकेचे शिकार झाले.

यापूर्वी देखील गिरीश महाजन हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून टीकेचे धनी झाले होते. दारूच्या ब्रँडला महिलांची नावे द्या, त्याने दारूचा खप वाढेल असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते आणि त्यासाठी त्यांना माफी मागण्याची देखील वेळ आली होती.

दारूच्या ब्रँडला महिलेचे नाव द्या मग विक्री वाढेल : भाजपच्या ‘ ह्या ‘ मंत्र्यांचे दुर्दैवी विधान

‘ ह्या ‘ कारणामुळे भाजपच्या मंत्र्यावर अखेर सगळ्या महिलांची माफी मागण्याची वेळ

कारखानदारांनो .. दारूला महिलांची नावे देता काय ? : असेल हिम्मत तर आडवा आता

दारूच्या दुकानाला आता ‘ ही ‘ नावे देता येणार नाहीत : सेन्सॉरशिप लागू

काय राव .. घरात कोंडलेला बिबट्या पण वनखात्याला धरता येईना

मारूती सुझुकी फॅक्टरीच्या इंजिन रूम मध्ये बिबट्या ? बकऱ्या नको म्हणतोय

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?