मी दलित आहे म्हणून ? : पण चौकशीत सापडले हे सत्य

By | October 8, 2017

i am dalit campaign

मिशी ठेवली म्हणून आपणास मारहाण करण्यात आली, अशी तक्रार मागील आठवड्यात गुजरातमधील एका दलित युवकाने दाखल केली होती. या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ सोशल मीडियावर मिशीसह सेल्फी ठेवण्याचा एक ट्रेण्ड आला होता.दलित व्यक्तीशी संबधीत हे प्रकरण सर्वच सोशल मीडियावर उचलून धरले गेले ( आम्ही नव्हे ) . मात्र पुढे चौकशी झाल्यावर जे स्पष्ट झाले ते सर्वांच्यासाठी धक्का देणारे होते.

ही घटना म्हणजे त्या युवकानेच रचलेला बनाव असल्याचं गुजरात पोलिसांनी शनिवारी स्पष्ट केलं. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी युवकानं हे कृत्य केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. “घटनेच्या तपासामध्ये मात्र पोलिसांच्या हाती नवी माहिती आली आहे. त्या युवकाला केवळ प्रसिद्धी हवी होती म्हणून त्याने स्वतःच हा बनाव रचला अशी माहिती आम्हाला साक्षीदारांकडून मिळाली,” असं गांधीनगरचे पोलीस अधीक्षक वीरेंद्र यादव यांनी बीबीसी शी बोलताना सांगितले

“संबंधित युवकाने दोन मित्रांच्या साहाय्याने ब्लेड विकत घेतली आणि स्वतःच्या पाठीवर हल्ला करून घेतला, फोरेन्सिक चाचण्यांमध्ये असं लक्षात आलं की, त्याच्या पाठीवर असलेल्या जखमेच्या खुणा या हल्ल्यात झालेल्या नसून हाताने काळजीपूर्वक केल्या आहेत . हल्ल्यादरम्यान झालेल्या खुणा या ओबडधोबड असतात पण या खुणा तशा नाहीत असं फोरेन्सिक चाचणीत लक्षात आलं “, असही यादव यांनी सांगितलं. याबाबत 27 सप्टेंबर रोजी लिंबोदरा इथे तक्रार दाखल करण्यात आली होती.

आपल्यावर पाठीमागून हल्ला झाला. जमिनीवर पडल्यामुळे आपणास हल्ला कोणी केला हे कळलं नाही, असं त्या युवकानं आपल्या पोलीस तक्रारीमध्ये म्हटलं होतं.मात्र जमिनीवर पडल्यानंतर त्याच्या शर्टाला माती लागायला हवी होती किंवा त्याला जखमा व्हायला हव्या होत्या. पण तसं काही आढळून आलं नाही , हे देखील पोलीस तपासात पुढे आलं आहे, असं यादव म्हणाले

तसेच या प्रकरणातील सर्वजण अल्पवयीन असल्यामुळं आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याचं यादव यांनी स्पष्ट केलं आहे. या केसचा पुढील तपास बंद करण्यात येणार असल्याचं यादव यांनी सांगितलं. ही घटना झाल्याचं समजताच गुजरातमध्ये मिशीसोबतचा फोटो ठेवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेक दलित युवक आपला मिशी असलेला किंवा मिशीला पीळ देतानाचा फोटो प्रोफाइल पिक्चर म्हणून ठेऊ लागले होते.

त्या मुलाची आई चंद्रिका महेरिया यांनी बीबीसी शी बोलताना सांगितलं “त्याची कुणीतरी दिशाभूल केली असावी. त्यामुळं त्याने हा बनाव रचला असावा, मात्र या घटनेनंतर तो खूप शांत झाला असून आम्हीही त्याला या विषयावर आणखी काही विचारणं टाळत आहोत,” असं त्यांनी म्हटलं. या घटनेनंतर त्याला मदत करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांशी महेरिया कुटुंबानं संपर्क केलेला नाही. कौशिक परमार हे त्या भागातील कार्यकर्ते या प्रकरणात त्याला मदत करत होते, पण आता महेरिया कुटुंबीय संपर्क टाळत असल्याचं त्यांनी सांगितलं.”

केवळ लाईक वाढवण्याच्या निमित्ताने होत असलेली उथळगिरी ह्या निमित्ताने समोर आली . मात्र आम्ही जबाबदार पेज चालवत आहोत . केवळ लाईक नकोत पण सोशल मीडियाचा सकारात्मक वापर व्हावा यासाठी बांधील आहोत .

? आमची ही पोस्ट आवडली असेल तर लाईक करा .. शेअर करा ?