होय .. मला राधे माँ ची भूमिका करायचीय : बॉलीवूड मधील ‘ ही ‘ अभिनेत्री

By | November 2, 2017

huma qureshi says she want to act as radhe maa in movie

राधे माँ सतत काही ना काही नौटंकी करत चर्चेत राहण्याचा प्रयन्त करत असते . मग ते हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप असूदेत किंवा बिना पासिंग ची लाल गाडी किंवा रडत रडत आपले गाऱ्हाणे मांडण्याची पद्धत . आपल्या भक्तांना आपल्या भक्तिभावात रंगवणारी राधे माँ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे

तिच्याबद्दल अनेक बऱ्या वाईट चर्चा रंगत असल्या तरी एका बॉलिवूड अभिनेत्रीला चक्क चित्रपटात तिची भूमिका साकारायची आहे.जर राधेमाँ वर चित्रपट निघाला तर मला तिची भूमिका करायला आवडेल असे हुमा कुरेशी हिने म्हटले आहे . गॅंग ऑफ वासेपूर पासून जॉली एल.एल.बी पर्यंत हुमा कुरेशीने बऱ्याच चित्रपटात काम केले असून , विविध प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे .

राधे माँ चा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता . त्या व्हिडिओवर एका एका युजरने लिहिले होते की, “स्वतःला अध्यात्मिक गुरु म्हणणं किती विचित्र आहे. मुख्य म्हणजे असे लोक अस्तित्वात आहेत? हे केवळ अशक्य आहे.” . त्याची हि कमेंट हुमा कुरेशी ने वाचल्यानंतर ,त्याच्या कमेंटनंतर अभिनेत्री हुमा कुरेशीने कमेंट केली, “मला तिच्या जीवनावर आधारित चित्रपटात भूमिका करायची आहे. ही खरंतर माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाची भूमिका ठरेल.”

हुमाची ही कमेंट वाचून एकदा त्यावर आणखी एका युझरने या विचित्र चित्रपटाची स्क्रिप्ट तरी कशी लिहायची, असे विचारले. त्यावर हुमा म्हणाली, “त्यासाठी विचित्रच स्क्रीप्ट लिहावी लागेल.” हुमाने ही इच्छा गंमतीने व्यक्त केली असली तरी राधेमाँ हे एक चर्चेतील कॅरॅक्टर असल्याने ह्या विषयावर देखील चित्रपट बनवण्याचा विचार बॉलिवूडमध्ये नक्कीच होऊ शकतो.

सुखविंदर कौर उर्फ राधे माँ संबंधित काही गोष्टी

  1. सुखविंदर कौर च्या जवळ सतत त्रिशूल असते . भक्तांच्या म्हणण्या नुसार त्या त्रिशूल च्या माध्यमांतून सुखविंदर कौर देवाशी संपर्क ठेवून असते . एकदा फ्लाईट मध्ये देखील त्रिशूल घेऊन जाताना मोठा वाद झाला होता .
  2. सुखविंदर कौरला भेटायचे असल्यास सर्वात आधी टल्ली बाबा ला भेटावे लागते. टल्ली बाबा आधी भक्त कोण आहे , कसा आहे याचे मोजमाप घेऊनच मग सुखविंदर कौर ला भेटण्याची परवानगी देण्यात येते .
  3. स्वतःला देवाचा अवतार समजणारी सुखविंदर कौर , स्वतः देवी दुर्गाची भक्त आहे आणि नियमितपणे देवी दुर्गाची पूजा करते .
  4. सुखविंदर कौरची आवडती गाडी जग्वार असून , तीचा आवडता रंग लाल , रंगामध्ये गाडी सजवलेली आहे .इतकेच काय तर गाडीच्या रिम देखील लाल बनवल्या आहेत . मात्र ह्या गाडीची पासिंग खोटी आढळली होती.
  5. सुखविंदर कौर ला तिचे भक्त राधे माँ म्हणून ओळखतात आणि ती मूळची पंजाबची आहे.
  6. सुखविंदर कौरचे भक्त तिच्या मध्ये लहान मूळ, बाळ दिसत असल्याचे देखील बोलतात म्हणूनच सुखविंदर कौर ला उचलून घेतात.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?