प्रेरणादायी : सॅमसंग नोकिया मोटोरोला आणि डीएसके ग्रुपचे जुने धंदे काय होते ?

By | October 23, 2017

history of samsung nokia motorola companies marathi

संघर्ष हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे.आज सॅमसंग,नोकिया मोटोरोला ह्या कंपन्या खूप मोठ्या झाल्या असल्या तरी त्यांचा इतिहास देखील खूप संघर्षाचा राहिला आहे .

सॅमसंग या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची शेकडो उपकरणं आज देशातील आणि परदेशातील बाजारात आहेत, पण सॅमसंग सर्वात जास्त नावारूपाला आली ती मोबाईल कंपनी म्हणून. सॅमसंगचा मोबाईल वापरला नाही असा माणूस भारत सापडणे देखील अवघड आहे. नोकिया नंतर सर्वात जास्त लोकप्रिय मोबाईल सॅमसंगचे होते . मोबाईल निर्मितीत आघाडीवर असेलली मोटोरोला कंपनीही सर्वांना माहित आहे. मात्र या सर्व मोबाईल कंपन्या सुरूवातीला काय बनवायच्या आणि काय विकायच्या हे पाहणे फार गमतीशीर आहे .

१) सॅमसंगवाले पूर्वी भाजीपाला विकत..

कोरियामध्ये 1938 साली सॅमसंगने भाजीपाला विकण्याच्या स्टोअरपासून सुरूवात केली. येथे सुके मासे, नुडल्स आणि हिरव्या पालेभाज्या विकायचे . सॅमसंगने 1960 साली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती सुरू केली. आणि आज देश विदेशापर्यंत सॅमसंग कंपनी पोहचली आहे . आता जगातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांपैकी एक आहे.

२) नोकियाचा आधी कागद निर्मितीचा कारखाना…

कागद निर्मितीचा करणारी कंपनी म्हणून नोकियाची ओळख होती, नोकिवीतृन नदीच्या नावावरून या कागद मिलला नोकिया नाव पडलं होतं. मोबिरा सिटीमॅन नावाचा पहिला मोबाईल नोकियाने 1987 साली बनवला, आणि त्यानंतर पुढचा इतिहास तर आपल्या सर्वाना माहित आहे . नोकिया म्हणजे कधी खराब न होणारा, दणकून बॅटरी बॅकअप देणारा असा ब्रँड होता . पुढे नोकियाच्या फोनने जगभरात उद्योग वाढवला.फिनलंड मध्ये नोकिया चे मोबाईल बनवले जायचे आणि फिनलंड च्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर ह्या कंपनीचा मोठा प्रभाव होता .

३) मोटोरौलावाले कार रेडिओ बनवायचे.

मोटोरौला कंपनी सुरूवातीला कार रेडिओ बनवण्यात आघाडीवर होती. पुढे पुढे मग मोटोरौलाने 1960 साली मोबाईल बनवणं सुरू केलं, आता मोटोरौला ही कंपनी लिनोवोसोबत मोबाईलची निर्मिती करत आहेत .

४) डी.एस. के. ग्रुप
आपल्या पुण्यातील डी.एस. के. ग्रुपचे मालक सुरुवातीला टेलिफोन सफाई आणि रिपेअरचा व्यवसाय करायचे . पुढे इंटेरिअरचे एक छोटे काम मिळाले . मग अजून कामे मिळू लागली आणि मग हळू हळू बिल्डर क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. डी.एस. के. ग्रुप च्या आज २० पेक्षा जास्त कंपन्या आहेत .कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात हि लहान लहान गोष्टींमधूनच होत असते . संघर्ष करत राहणे हे आपल्या हातात आहे.

? सहमत असाल तर लाईक करा शेअर करा ?