पाकिस्तानच्या घरावर हिंदुस्थान जिंदाबाद आणि सारे जहाँसे अच्छा : काय आहे प्रकरण ?

By | December 5, 2017

hindustan zindabad on pakistani town wall youth arrested by police

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील एका तरुणाने आपल्या घराच्या भिंतीवर ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ असे लिहिल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे समजते. पाकिस्तानमध्ये तेथील आर्मी ही स्थानिक जनतेवर अन्यायच करत आलेली आहे. बलोच प्रांतात तर कित्येक बलोच नागरिकांचे पाकिस्तानी सैन्याने अपहरण केले असून कित्येक वर्षानंतर देखील त्यांचा मागमूस नाही.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद शाह असे या तरुणाचे नाव आहे.स्थानिक नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली त्यानुसार पोलिसांनी साजिदच्या घरावर छापा घातला. त्यावेळी घरातील व्यक्तिंनी साजिदने हा प्रकार केल्याची माहिती दिली.केवळ हिंदुस्थान जिंदाबाद लिहून साजिद थांबला नाही तर सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा असे देखील या सोबतच लिहलेले पोलिसांना आढळले. साजिद शाहवर पाकिस्तानी पिनल कोड ५०५ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

पाकिस्तानमध्ये चित्रपट बनतात मात्र ते कोणी पाहत नाही मात्र भारतीय चित्रपट पाकिस्तानमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत . भारतातील बहुतांश टी.व्ही. चॅनेल देखील पाकिस्तान मध्ये पाहिले जातात . स्थानिक कार्यक्रम अत्यंत टुकार असल्याने त्यांना प्रेक्षकवर्ग लाभत नाही तसेच तेथील बहुतांश थिएटर देखील बंद पडले असून त्यांच्या जागी मॉल उभे राहिले आहेत . मात्र भारतीय चित्रपटांचा तेथील जनसामान्यांवर मोठा पगडा आहे. याआधी देखील एक जनाने आपल्या घरावर तिरंगा फडकावला होता, पुढे तो विराट कोहली चा फॅन असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले होते.

तसाच काहीसा प्रकार साजिद शाह याच्या बाबतीत देखील झाला आहे. साजिदवर भारतातील चित्रपटांचा चांगलाच पगडा असल्याचेही त्याच्या घरच्यांनी म्हटले आहे. तसेच तो सतत भारतीय चित्रपटांची गाणी देखील ऐकत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारतीय चित्रपटांचा तो देखील जबर फॅन आहे असे घरच्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्याने सार्वजनिकरित्या भारताची स्तुती करण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्टीकरण त्याच्या घरच्यांनी दिले आहे.

स्थानिक नागरिकांनी त्याला हा स्लोगन काढून टाकण्यास सांगितले होते मात्र त्याने ऐकले नाही मग नागरिकांनी मोबाईल ने हे फोटो काढून पोलिसांना पाठवले व त्यानुसार साजिद शाह वर कारवाई करण्यात आली

ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

डेटा चोरीच्या आरोपाखाली यूसी ब्राऊजर ला दाखवला गुगलने बाहेरचा रस्ता

‘ ह्या ‘ पद्धतीने ओळखा सरकारी नोकरीसाठी आलेली फसवी जाहिरात

आणि ‘ म्हणून ‘ त्याने ट्विटरवर चक्क डोनाल्ड ट्रंप यांचे अकाउंट बंद केले

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?