आरोप कशाच्या आधारे ? प्रकाश आंबेडकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

By | January 8, 2018

prakash ambedkar blames hindu organisations over violence in maharashtra

भीमा कोरेगाव घटनेत संभाजी भिडे यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव गोवण्यात आले आहे. भिडे गुरुजी व एकबोटे यांच्या विरोधात खोटा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, यामागे काही समाजविघातक प्रवृत्ती असून, यासाठी आíथक देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोप देखील नगर इथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला होता . शिवप्रतिष्ठान व हिंदुस्थान संघटनेचे कार्य दिवसेंदिवस राज्यात वाढत आहे. काही असंतुष्ट जातीयवादी शक्तींना हे बघवत नाही. त्यामुळे राजकीय हेतूने भीमा कोरेगाव घटनेत संभाजी भिडे गुरूजी व मिलिंद एकबोटे यांचे नाव गोवले गेलेले आहे. तसेच सदर घटना घडली तेव्हा भिडे गुरूजी व एकबोटे हे तेथे नव्हते, आमदार जयंत पाटील यांच्याकडे सांत्वन करण्यासाठी गेलेले होते व एकबोटे काही घरगुती कार्यक्रमासाठी पुण्यामध्येच होते. हिंदुत्ववादी शक्तींना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप देखील नगर येथील मोर्चाच्या वेळी करण्यात आला होता.

ह्या पार्श्वभूमीवर ,आज सांगली इथे विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भिडे यांच्यावरील आरोप खोटे असून यांचे नाव नाहक गोवण्यात आलेले आहे, असा आरोप केला आहे.

याबद्दल बोलताना शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले म्हणाले, ‘‘खोटा गुन्हा दाखल केला असला तरी, सर्वधर्मीयांना भिडे गुरुजींचे कार्य माहीत आहे. या प्रकरणात त्यांचा संबंध नसतानाही गोवले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. सरकारी मालमत्तेची नुकसानभरपाईही त्यांच्याकडून वसूल झाली पाहिजे.गुरुजींवर आरोप करणारे दलित नेते प्रकाश आंबेडकर यांची सखोल चौकशी करावी. कशाच्या आधारे ते आरोप करीत आहेत, याचा तपास करावा. कोरेगाव भीमा दंगलीत बळी गेल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा.

ह्या वेळी अभिमन्यू भोसले (मातंग समाज), अंकुश माने (कैकाडी समाज), महेंद्र चंडाळे (वाल्मिकी म्हेतर समाज), दत्तात्रय माळी, प्रदीप बर्गे, धनंजय सूर्यवंशी (मराठा समाज), संतोष लोखंडे (भुई समाज), सचिन पवार (गोल्ल समाज), मनोहर साळुंखे (परीट समाज), अमित करमुसे, संजय बसरगी (गोसावी समाज), गणेश कोयते (चर्मकार समाज), विनायक एडके (धनगर समाज), विजय काबरा (सिंधी समाज), मोहन पतंगे (शिंपी समाज), रोहित नगरकर (कंजारभाट समाज) ह्या सर्वानी भिडे गुरुजी यांच्या पाठी आपण उभे राहण्यासाठी सक्षम असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली.

  • आज सांगलीत बहुजन संघटनेचा मोर्चा

दरम्यान , आज सांगलीत बहुजन संघटनांच्या मोर्चाला सुरूवात झालीय. विश्रामबागेतल्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली.कोरेगाव भीमा प्रकरणातील दोषींवर लवकर कारवाई करावी या मागणीसाठी आज सांगली मध्ये बहुजन संघटनांचा मोर्चा काढला आहे. सांगलीचे रहिवासी असणारे संभाजी भिडे यांच्यावर याप्रकरणी चिथावणीखोर भाषणं दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्या प्रकरणी पोलीस टाळाटाळ करत असल्याचा देखील मोर्चेकऱ्यांचा आरोप आहे.

तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये नाव आलेले संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दलच्या १५ माहित नसलेल्या गोष्टी

.. तर हिंदूंच्या घरात देखील हाफिज सईद जन्माला येईल: प्रकाश आंबेडकर

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा