डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम ला तुरुंगात दिलय ‘ हे ‘ काम

By | September 19, 2017

चंदीगड- दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम याला 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या त्याला रोहतक येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राम रहिमला तुरंगात काय काम करत असेल, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले.तसेच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
मात्र, त्याला तुरुंग प्रशासनाने भाजी लागवडीचे काम दिले आहे. यासाठी त्याला 8 तासासाठी 20 रुपयांची मजुरी मिळणार आहे.
परिसरात छोटीशी जमीन आहे. त्याठिकाणी राम रहिम भाजीपाला लागवडीचे काम करणार असल्याची माहिती तुरुंग विभागाचे महासंचालक के. पी. सिंह यांनी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले, राम रहिमने आधीच भाजीपाला लागवडीच्या कामाची जबाबदारी स्वीकारली आहे. जे काही भाजीपाल्याचे उत्पादन राम रहिम घेईल, त्याचा उपयोग तुरुंगातील कैद्यांच्या खाण्यासाठी मेसमध्ये करण्यात येणार आहे.
याचबरोबर बाबा राम रहीम तुरुंग परिसरातील झाडांची छाटणी करील. त्याला देण्यात आलेले हे काम अकुशल कामकाजाच्या वर्गात मोडते. तसेच, त्याला कोणतीही व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही. इतर कैद्यांप्रमाणेच त्याला ठेवण्यात आले आहे, असेही के. पी. सिंह म्हणाले.

बाबाची कथित बेटी हनीप्रीत ही फरार झाली असून,ती नेपाळ सीमेवर दिसल्याचे काही जणांचे म्हणणे आहे,म्हणून भारतीय पोलिसांची नेपाळ पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम सुरु आहे