‘ ह्या ‘ कारणामुळे भाजपच्या मंत्र्यावर अखेर सगळ्या महिलांची माफी मागण्याची वेळ

By | November 6, 2017

girish mahajan bjp minister says sorry to all females for his controversy statement on wine names

आधी वाद निर्माण होईल असे बोलायचे आणि मग माफी मागायची, हे देशाच्या राजकारणात नवीन नाही. यापूर्वी देखील अजित पवार यांच्यावर देखील ही वेळ आली होती. असाच वाद निर्माण करून माफी मागायची वेळ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आली आहे

दारूच्या ब्रँडला महिलांची नाव द्या ,या वादग्रस्त अशा विधानानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर चौफेर टीका होऊ लागल्यावर अखेर गिरीश महाजन यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली.कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे . मी केलेल्या विधानाबदद्ल मला खंत असल्याचे ते म्हणाले आहेत . जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या व्यक्तव्यावर चौफेर टीका झाल्यानंतर गिरीश महाजन आपला माफीनामा दिला आहे. महिलांबद्दल वक्तव्य करणं यात माझी चूक झाली असून मी नकळतपणे बोललो, त्यामुळे सगळ्या महिलांची मी माफी मागतो, अशी म्हणण्याची वेळ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आली.

सत्तेची नशा असली आपण काय आणि कोठे बोलतोय याचे भान राहत नाही. सरकार काँग्रेसचे असो व भाजपचे मंत्र्यांचा तोरा आणि सत्तेची नशा यात ते एवढे गुरफटून जातात कि जिभेवरचे नियंत्रण निघून जाते . असाच काहीसा प्रकार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा बाबतीत झाला होता.

  • नेमके काय होते प्रकरण ?

नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या वेळी त्यांचे भाषण चालू होते यावेळी ते बोलत होते, . ‘भिंगरी’ ‘ज्युली’, ‘बॉबी’ असल्या नावांची दारु चांगली खपते. तुम्ही उत्पादन करत असलेल्या दारुचे नाव महाराजा आहे मग कसे काय जमेल? त्या दारुचे नाव महाराणी करा मग बघा कसा खप वाढतो असे गिरीश महाजन यांनी विनोदाने म्हटले. त्यावेळी उपस्थितांमध्ये तात्पुरता हशा देखील हशा पिकला मात्र अनेकांना महाजन यांचे हे वक्तव्य अजिबात आवडले नसल्याची प्रतिक्रिया देखील लोकांमध्ये होती . दारुच्या ब्रँडला महिलेचे नाव द्या मग बघा कसा खप वाढतो, हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याने त्यांनी हाताने ( तोंडाने ? ) नवीन वाद ओढवून घेतला होता.

मात्र ते इतक्यावर थांबले नाहीत, हल्ली तंबाखूची नावेही कमल, विमल अशीच असतात. तसाच प्रयोग दारुच्या बाबतीत करा,असेही पुढे मार्गदर्शन करायला ते विसरले नाहीत . साखर कारखान्यांनी निर्मिती केलेल्या दारूला महिलांची नावे दिल्यास खप वाढेल, हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विधान दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया लोकांमधून उमटत होती . एकीकडे महिला सबलीकरणाच्या गोष्टी करायच्या आणि अशी असभ्य विधाने करायची हे अत्यंत दुर्दैवी आहे .

चंद्रपुरातील दारुबंदी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात तर मूल पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. दारुच्या ब्रँडला महिलेचे नाव द्या असे म्हणत गिरीश महाजन यांनी महिला वर्गाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकेच नाही तर महाजनांवर कारवाई व्हावी यासाठी आपण राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचेही अॅड. पारोमिता गोस्वामी स्पष्ट केले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे हे विधान हाच भाजपचा खरा चेहरा आहे असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून गिरीश महाजनांवर टीका केली आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?