धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे : ‘अशी ‘ घडली गौरी लंकेश यांची हत्या

By | June 16, 2018

gauri lankesh murderer parshuram waghmare in sit investigation

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने परशुराम वाघमारे नावाच्या व्यक्तीला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे . एसआयटीच्या सुत्रांनुसार, गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबूली परशुराम वाघमारेने दिली आहे. 5 सप्टेंबर 2017 रोजी परशुरामनेच गौरी लंकेश यांच्यावर चार गोळ्या झाडल्याची कबुली दिली आहे. ‘धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे, असं मला मे २०१७ मध्ये सांगण्यात आलं. मी त्यासाठी तयार झालो. ज्या व्यक्तीला मारायचे आहे त्याच्याबद्दल माहीच माहिती नव्हतं, अशी कबुली परशुरामने दिल्याची माहिती आहे. मात्र तरीही एका महिलेला मारल्याचे दुःख आहे मात्र धर्माच्या रक्षणासाठी हे गरजेचे होते असे त्याने म्हटले आहे.

एसआयटीच्याच्या चौकशीदरम्यान वाघमारे बोलू लागला आहे, त्याने सांगितले कि , 3 सप्टेंबर रोजी मला बंगळुरूत नेण्यात आलं. बंगळुरूत नेण्याआधी मला बेळगावात एअरगनद्वारे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. हत्येच्याआधी तीन वेळा तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी दुचाकीवरुन गौरी लंकेश यांच्या घराच्या परिसरात नेलं होतं. पण, ते तीन जण कोण होते, हे मला माहित नाही.

‘5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी जवळपास 4 वाजेच्या सुमारास मला बंदूक दिली गेली. माझ्या बरोबर असलेली एक व्यक्ती व मी गौरी लंकेश यांच्या घरी गेलो. आम्ही योग्य वेळेत त्यांच्या घराजवळ पोहचलो. त्यावेळी गौरी लंकेश यांच्या घराजवळ आल्या होत्या. मी त्यांच्या गाडीजवळ पोहचण्यावेळी त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला होता. त्याचवेळी मी त्यांच्यावर गोळ्या झाल्या. त्यानंतर आम्ही परतलो आणि मी त्याच रात्री शहर सोडलं. अशी माहिती परशुरामने पोलिसांना दिल्याचं समजतं आहे.

एसआयटीच्या चौकशीत हिंदू जनजागृती समितीचा थेट सहभाग असल्याचे आढळून आलेले नाही मात्र परशुराम वाघमारे हा प्रमोद मुतालिक यांच्या श्रीराम सेनेशी संबंधित असल्याचे एसआयटीचे म्हणणे आहे . प्रमोद मुतालिक यांचा १९६३ ला ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेला असून काही काळ ते आरएसएसशी देसखील जोडलेले होते . सध्या प्रमोद मुतालिक यांची श्रीरामसेना नावाने संघटना असून अनेक भाषणांमधून सामाजिक तेढ निर्माण व्हावी अशी चिथावणीखोर भाषणे त्यांनी याआधी दिलेली आहेत . एके काळी प्रमोद मुतालिक हे शिवसेनेत होते मात्र बेळगाव प्रश्नावर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता .