देवाचे शनी शिंगणापूर गॅंगवॉरने हादरले : भर बाजारात एकाचा अमानुष खून

By | December 22, 2017

ganesh bhutkar killed in shani shinganapur due to money cause

शनिशिंगणापूर (ता. नेवासा, जि .नगर ) येथे आर्थिक वादातून चार जणांनी एकाची अमानुषपणे हत्या केली. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान हा प्रकार घडला. ह्या हल्ल्यात गणेश मच्छिन्द्र भुतकर (वय ३० ) याचा मृत्यू झाला. भुतकर याच्यावर देखील सोनई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत .

गणेश भुतकर याचे शनी शिंगणापूर येथील त्याचा मित्र अविनाश बनकर याच्याशी आर्थिक वाद होते. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजन्याच्या सुमारास शनी शिंगणापूर येथील वाहनाजवळ भुतकर उभा होता. याचवेळी अविनाश बनकर ,मयूर हरकल, लखन ढगे व अर्जुन महाले यांनी कुऱ्हाड व तलवारीने गणेश याच्यावर हल्ला केला.हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. काही जणांनी लगेच ह्या प्रकारची शनी शिंगणापूर पोलिसांना माहिती दिली . पोलीस पथकाने तात्काळ धाव घेतली व भुतकर याला उपचारासाठी नगर इथे हलवले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शनी शिंगणापूर येथे भुतकर याला जिथे मारले तिथे पोलिसांना दोन गावठी कट्टे आढळून आले आहेत. त्यामुळे भुतकर याच्यावर गोळीबार देखील झाल्याची चर्चा आहे मात्र भुतकर याच्या शरीरावर कोणतीही गोळी लागली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर शनी शिंगणापूर परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला असून,परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

भुतकर आणि त्याला मारणाऱ्या मारेकऱ्यांवर देखील अनेक गंभीर गुन्हे आहेत. भुतकर हा तडीपार असताना शनी शिंगणापूरला आला होता. त्यामुळे पोलीसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या हत्येनंतर शनी शिंगणापूर आणि सोनईत नागरिकांनी त्वरित दुकानं बंद केली गेली. दरम्यान, भुतकरने यापूर्वी शनी शिंगणापूरच्या पोलीस निरीक्षकाला भर रस्त्यात सिनेस्टाइल बेदम मारहाण केली होती. तर मद्यपान करुन शनीच्या चौथऱ्यावर चढून कर्मचाऱ्यांना देखील मोठी शिवीगाळ केली होती. त्याचबरोबर संस्थाच्या तत्कालीन सीईओंना धमकावलं होतं. त्याचबरोबर गावठी कट्ट्याच्या विक्रीतही त्याचा सहभाग होता. भुतकरच्या कारनाम्याची एबीपी माझाने याबद्दल वृत्त दिल्यानंतर भुतकर यास तडीपार करण्यात आलं होतं.

बापरे..महिला तहसीलदारांना वाळू तस्करांकडून अक्षरश: डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न

आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत

गोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..’ ह्या ‘ गोष्टीला केली सुरुवात

चेकने जास्त व्यवहार करत असाल तर ‘ ही ‘ आनंदाची बातमी नक्की वाचा

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?