मैं सचमुच चला जाऊंगा : हेराफेरीच्या माध्यमातून नितेश राणेंकडून शिवसेनेची खिल्ली (व्हिडिओ)

By | November 28, 2017

funny video posted by nitesh rane herapheri over uddhav thakare

महाराष्ट्रात एकत्र सत्तेत असले तरी शिवसेना आणि भाजप मधील धुसफूस रोज चालू आहे. एके काळी कट्टर मित्र असलेले, शिवसेना भाजप यांचा आज एक दिवस सुद्धा एकमेकांवर टीका केल्याशिवाय जात नाही . दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. उद्धव ठाकरेंकडून सत्ता सोडण्याची भाषाही अनेकदा झाली आहे. मात्र सरतेशेवटी दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेतच. शिवसेनेला त्रास होत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे असा सल्ला विरोधकांनी देखील दिला आहे मात्र शिवसेना आम्ही सत्तेत देखील आहोत व विरोधात देखील असे म्हणून स्वतः ची बाजू रेटून धरीत आहे.

शिवसेनेच्या ह्या दुटप्पी भूमिकेची आता काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे. अर्थात निशाण्यावर उद्धव ठाकरे आहेत. राणे फॅमिली आणि शिवसेना यांचे विळा भोपळ्याचे नाते आपल्याला ठाऊक आहेच. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी हेराफेरी या हिंदी सिनेमातील एक प्रसंग निवडला आहे. या प्रसंगातील परेश रावल यांच्या चेहऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा, अक्षय कुमारच्या चेहऱ्यावर उद्धव ठाकरेंचा चेहरा आणि सुनील शेट्टीच्या चेहऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा चेहरा लावून एक व्हिडिओ अपलोड केला आहे .

हेराफेरीमधील तो विनोदी प्रसंग ज्यात अक्षय कुमार परेश रावल यांच्या घरामध्ये भाड्याने राहत असतो आणि भाडे मात्र कधी देत नाही वरतून सुनील शेट्टीला जर घरात ठेवणार असाल तर मी हे घर सोडून जाईल अशी धमकी देतो . यावर परेश रावल अक्षय कुमारला तू जा .मग अक्षय कुमार गेल्यासारखे करतो आणि पुन्हा येऊन म्हणतो मी घरभाडे दिल्याशिवाय जाणार नाही. मग परेश रावल म्हणतात की याचा अर्थ तू घरातून कधीही जाणार नाही. अशा आशयाचा हा प्रसंग आहे जो राजकीय नेत्यांचे चेहेरे लावून नितेश राणे यांनी ट्विट केला आहे.

उद्धव ठाकरे जेव्हा सरकारला सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देतात तेव्हा काय होते तुम्हीच पाहा अशा ओळी लिहून हा व्हिडिओ नितेश राणे यांनी ट्विट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.नितेश राणे यांच्याकडून शिवसेनेचीखिल्ली या आधी देखील उडवण्यात आली आहे मात्र व्हिडिओ च्या माध्यमातून बहुदा असे ट्विट प्रमाणात केले असावे. अर्थात शिवसेना देखील असा काहीसा प्रसंग निवडून राणे यांना टार्गेट करू शकते . त्यामुळे ‘सामना ‘ व ‘प्रहार ‘ मध्ये खुन्नस पोस्टर वॉर आपल्याला बघायला मिळू शकते.

शिवसेनेच्या ‘ ह्या ‘ मास्टरप्लॅनचा भाजपने घेतलाय धसका : शिवसेना डायरेक्ट भिडणार

‘ ह्या ‘ महत्वाच्या वेळी देखील शिवसेनेने भाजपला दाखवला ठेंगा

उद्धव ठाकरे वांद्र्याचे बॉस, राहुल गांधी पप्पू तर थापा मारणारे फेकू का नको ? : सामनामधून हल्लाबोल

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?