बापरे.. मुंबईमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

By | January 8, 2018

former shivsena corporator ashok sawant murderded in mumbai

मुंबईतील गुन्हेगारी आणि खंडणी हे प्रकार मुंबईमधील व्यावसायिकांसाठी नवीन राहिलेले नाहीत. अगदी फेरीवाल्यांपासून तर मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वानाच हा अघोषित असा प्रोटेक्शन मनी द्यावा लागतो. मात्र सरकारमधील लोकप्रतिनिधींना सुद्धा अशा प्रकारचे फोन येणे आणि त्यावरून हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाणे यावरून मुंबईत कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यावाचून पाहणार नाही.

मुंबईतील कांदिवली समतानगरचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री चॉपरने वार करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. सावंत हे आपल्या मित्राला भेटून घरी परतत होते त्याचवेळी त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला . ही घटना साधारण रात्री ११ वाजता घडली . रात्री ११ च्या दरम्यान सावंत आपल्या मित्रांकडे गेले होते , ते तिथून आपल्या घरी परतले, समतानगर येथील स्वतः राहत असलेल्या इमारतीखाली हे हल्लेखोर एका गाडीत दबा धरून बसले होते . सावंत आल्याचे दिसताच त्यांनी अचानक उतरून सावंत याच्यावर हल्ला चढवला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि त्यांच्यावर चॉपरने वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांना उपचारासाठी त्वरीत जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच सावंत यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. ह्या दुर्दैवी अशा घटनेनंतर परिसरामध्ये खळबळ उडाली होती. खंडणीमुळे ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सावंत हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत . काही वर्षांपासून सावंत यांनी केबलचा व्यवसाय सुरु केला होता . मात्र गेल्या काही दिवसांपासून सावंत यांना खंडणीसाठी अज्ञात लोकांकडून धमकावण्यात येत होते . धमक्यांचे फोन येत असल्याने त्यांनी याबद्दल तक्रार देखील नोंदवली होती. ह्या हल्ल्यामध्ये त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.दहशतवाद विरोधी पथकातील एसीपी सुभाष सावंत हे त्यांचे भाऊ आहे.

इमारतीमधील सीसीटीव्हीमध्ये सावंत यांचे मारेकरी कैद झाले असून यातील एका आरोपीची ओळख पटली आहे. जग्गा असं या आरोपीचं नाव असून तो कुख्यात गुंड असल्याचं बोलल जातंय, असे वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सावंत यांना खंडणीसाठी धमकावण्यात येत होतं, त्यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दाखलही केली होती. सावंत हे दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

मुंबईमध्ये अशा राजरोस लोकप्रतिनिधींच्या हत्या होत असतील तर मुंबईत कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे असा प्रश्न जनतेला पडणे साहजिक आहे .

अश्विनी बिद्रे यांचा घातपात ? अभय कुरुंदकरांच्या घरात सापडले महिलेचे केस, रक्ताचे डाग

तब्बल ‘ दीड ‘ वर्षांपासून ह्या महिला पोलीस अधिकारी गायब : तरीसुद्धा पोलिसांचे सहकार्य नाही

सांगलीतील अनिकेत कोथळेच्या खून प्रकरणाला एक नवीन वळण : नातेवाईकांचा गंभीर आरोप

अनिकेत कोथळेच्या खुनानंतर होता ‘ याचा ‘ नंबर : कामटेचे पुढचे फसलेले टार्गेट

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा