हप्तेखोरीच्या रॅकेटमुळे फेरीवाल्यांना परवाने नाहीत. मनसेचा सहभाग असल्याचा आरोप

By | October 29, 2017

feriwala permits are not given due to source of illegal money for manse sanjay nirupam blames

फेरीवाल्यांकडून मनसेचे मालाड पश्चिमेचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा निषेधार्ह आहेच मात्र दुर्दैवाने ठोस तोडगा काही काढण्यापॆक्षा ह्या विषयावर राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल असेच प्रयन्त असल्याचे, एकंदरीत आरोप प्रत्यारोप पाहता वाटत आहे. फेरीवाल्यांकडून हप्तेवसुली करणाऱ्या रॅकेटमध्ये मनसेचे नेतेही सहभागी असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. मनसेने मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे मनसे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम समोरासमोर आलेले आहे.

संजय निरुपम म्हणाले, “फेरिवाले ही जागतिक समस्या आहे. जगातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मी फेरिवाल्यांना पाहिले आहे. ही फक्त मुंबईपुरती मर्यादित समस्या नाही. त्यामुळे नागरिकांनी फेरिवाल्यांऐवजी ही समस्या वाढवणाऱ्या पालिका प्रशासनावर टीका करावी. फेरीवाल्यांच्या प्रश्नांसंदर्भात मी गेली अनेक वर्षे संबंधितांशी चर्चा करत आहे. त्यांना परवाने देण्याची देखील देण्याची मागणी करत आहे. पण यासंदर्भात काहीही हालचाली होत नाही. कारण या सगळ्या रॅकेटमध्ये हप्तेखोरी आहे. ज्यामध्ये मनसेचे नेते देखील सहभागी आहेत.”

मात्र , मुंबईत जेथे फेरीवाले कमकुवत असतील तेथेच मनसेची दादागिरी चालेल. मात्र ज्या भागात फेरीवाले वरचढ असतील तेथे मनसेला मारच खावा लागेल मुंबईतून मनसेची दादागिरी मोडून काढण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, अशी आव्हान देखील देखील संजय निरुपम यांनी दिले आहे.

मालाड पोलीस ठाण्यात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपमांविरोधात विनापरवानगी सभा घेऊन भाषण केल्यानिमित्त गुन्हा दाखल झाला आहे. मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केल आहे. पोटासाठी आलेले फेरीवाले किती दिवस मनसेवाल्यांकडून फक्त मार खाणार . ते मार खाऊन माझ्याकडे आल्यावर मी त्यांना काय उत्तर देऊ ,असेही ते म्हणाले.

मालाड पश्चिम येथील सभेत संजय निरुपम म्हणाले होते कि , ‘फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन, फडणवीस सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जर या गरीब फेरीवाल्यांना पोलिसांचे संरक्षण मिळाले नाही, त्यांना जर मारहाण होत राहील. तर ते कायदा हातात घेतील. रस्त्यावर उतरतील, मग कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल आणि त्याची जबाबदारी फक्त तुमच्यावर असेल’.

ह्या सभेनंतरच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे , संजय निरुपम यांनी मनसेचे कार्यकर्ते हफ्ता मागत होते, शेवटी वैतागून फेरीवाल्यांनी हल्ला केला. मनसेने गुंडागर्दी सुरु केली आहे, मनसेने कायदा हातात घेतल्यानेच असे प्रकार होत असल्याचे संजय निरुपम यांचे म्हणणे आहे.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढून रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते . मनसे कार्यकर्त्यांनी देखील फेरीवाल्यांचे मारहाण केल्याचे प्रकार घडले होते . फेरीवाल्यांचा माल देखील रस्त्यावर फेकून देण्यात आला होता . राज ठाकरे यांनी मात्र फेसबुकच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं होतं.पुढे .शेवटी संजय निरुपम यांच्या विखारी भाषणाने फेरीवाल्यांमध्ये हवा भरण्याचे काम केले आणि पुढे ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे संजय निरुपम हे आधी शिवसेनेत होते आणि यांना मोठे करण्यात ठाकरे कुटुंबियांचे योगदान राहिले आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply