अश्विनी बिद्रे यांचा घातपात ? अभय कुरुंदकरांच्या घरात सापडले महिलेचे केस, रक्ताचे डाग

By | December 9, 2017

ashwini gore is missing since last 18 months family blames seniors

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे गेलाय दीड वर्षांपासून बेपत्ता आहेत त्यातील मुख्य संशयित आरोपी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना पनवेल कोर्टाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रे यांचा घातपात केला असल्याचा अश्विनी यांच्या घरच्यांचा आरोप आहे.

बेपत्ता होण्यापूर्वी अश्विनी यांनी विपश्यनेसाठी जाणार आहेत असे मला सांगितले होते, असं अभय यांनी पोलिसांना सांगितलं होतं. मात्र महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली व हिमालयातील बहुतांश विपश्यना केंद्रात पोलिसांनी तपास केला असून काहीही धागेदोरे मिळालेले नाहीत त्यामुळे ह्या प्रकरणी प्रथमदर्शनी तरी संशयाची सुई संशयाची सुई अभय कुरुंदकर यांच्याकडे जात असल्याचं एसीपी प्रकाश निलेवाड यांनी कोर्टापुढे सांगितले आहे.

अश्विनी गायब झाल्यानंतर काही ठळक गोष्टी कोर्टापुढे मांडण्यात आल्या त्यात , अभय कुरुंदकर यांनी भाईंदर मधील घराचा रंग बदलला,सोबतच भिंतीवर काही रक्ताचे डाग व घरात महिलेचे केसही आढळून आले आहेत. त्याच काळात कुरुंदकरने घराची स्वच्छता करून घेतली. कुरूंदकरने त्याच काळात रंग का बदलला, त्या घरात काही अनपेक्षित घटना घडली आहे का? कि हा निव्वळ योगायोग आहे ? याचा तपास पोलिस करत आहे.

पोलिसांना तपासकामी अभय कुरूंदकर कोणतेही सहकार्य करत नाहीये. पोलिस दलातच असल्याने त्याला सर्व ट्रिक माहित आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशी व त्रोटक स्वरूपात देत आहे, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात माहिती सादर केली. यानंतर त्यांना आणखी सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. ‘एबीपी माझा’वर अभय कुरुंदकर अश्विनी बिद्रेंना मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फूटेज दाखवल्यानंतर पोलिसांनी दबावाखाली येऊन अभय कुरुंदकर यांना अटक केल्याचा दावा त्यांच्या वकीलाने कोर्टासमोर केला.

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात कुरुंदकराचा सहभाग आहे हे अश्विनीचे पती, वडिल व भाऊ हे वारंवार सांगत होते. याबाबत त्यांनी पोलिसांत रीतसर तक्रारी दिल्या आहेत. मात्र, पोलिसांनी आजपर्यंत या प्रकरणाची दखल घेतली नव्हती. अखेर या प्रकरणात अश्विनी यांनी कुरूंदकर आणि त्यांच्यात झालेले संभाषण मोबाईल व संगणकात सेव्ह करून ठेवलेल्या बाबी कुटुंबियांच्या हाती लागल्यानंतर त्यांच्या बेपत्ता होण्यामागे कुरूंदकर यांचाच हात असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांचे संभाषण व व्हिडिओ आधी सोशल मिडियात व नंतर मेन स्ट्रीम माध्यमांत येताच पोलिसांवर दवाब वाढला.

मुख्यमंत्री फडणवीस याची तात्काळ दखल घेत योग्य कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिका-यांना दिले.आणि अभय कुरुंदकर यांना अटक करण्यात आली. आता अश्विनी बेपत्ता प्रकरणी कुरुंदकराच्या विरोधात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अश्विनी यांची हत्या झाली असावी व या घातपातामागे अभय कुरूंदकर असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्याचमुळे कोर्टाने त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील आठवडाभर या प्रकरणी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. त्याचवेळी त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. आणि अश्विनी बिद्रे यांचे नाव अश्विनी गोरे झाले. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.

पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती,पुढे 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. तिथे देखील अभय कुरुंदकर हे अश्विनीला भेटण्यासाठी येत असत मात्र कोंबड झाकलं तरी सूर्य उगवायचा थांबत नाही. लवकरच हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.

हे प्रकरण अश्विनी यांच्या घरी समजल्यानंतर अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये वादाला सुरुवात झाली. कुरुंदकर यांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. पुढे 2015 साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत या आशयाचं पत्र पोलिस खात्याने घरच्या पत्त्यावर पाठवलं तेव्हा अश्विनी गायब असल्याचे घरच्यांच्या लक्षात आलं. व त्यांनी कुरुंदकर यांच्यावर संशय व्यक्त करत कळंबोली पोलिसात तक्रार दाखल केली. अभय कुरुंदकर या पोलिस अधिकाऱ्यानेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा घातपात केल्याचा संशयसुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

घरच्यांनी मग शोध घ्यायला सुरु केलं, आणि अश्विनी यांचा कॉम्प्युटर ओपन केला तर त्यात अश्विनी यांनी कुरुंदकर यांच्यासोबतच सर्व संवाद रेकॉर्ड करून ठेवले होते, त्यात अभय कुरुंदरकांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या होत्या. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय कुरुंदकर हे तात्काळ रजेवर गेले होते मात्र अखेर आता त्यांना अटक झाल्याने बऱ्याच गोष्टी उघड होतील ,आणि सत्य बाहेर येईल अशी शक्यता आहे.

अश्विनी व अभय यांच्यातील भांडणाचा एक व्हिडीओ देखील पोलिसांच्या तसेच मिडीयाच्या हाती लागला असून त्यात अभय हे अश्विनी हिस गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या फुटेज सोबतच इतरही पुरावे हस्तगत करण्याचे काम सुरु केले आहे

तब्बल ‘ दीड ‘ वर्षांपासून ह्या महिला पोलीस अधिकारी गायब : तरीसुद्धा पोलिसांचे सहकार्य नाही

अटकेत असलेल्या आरोपीचा पोलिसांकडून खून आणि परस्पर विल्हेवाट : महाराष्ट्रातील घटना

सांगलीतील अनिकेत कोथळेच्या खून प्रकरणाला एक नवीन वळण : नातेवाईकांचा गंभीर आरोप

अनिकेत कोथळेच्या खुनानंतर होता ‘ याचा ‘ नंबर : कामटेचे पुढचे फसलेले टार्गेट

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

2 thoughts on “अश्विनी बिद्रे यांचा घातपात ? अभय कुरुंदकरांच्या घरात सापडले महिलेचे केस, रक्ताचे डाग

  1. Pingback: नाशिकमध्ये मुलींची तस्करी.. बांगलादेशी तरुणीचे पोलिसांवर धक्कादायक आरोप – Marathi People

  2. Pingback: अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचा दाट संशय.. मिळाले महत्वाचे धागेदोरे – Marathi People

Leave a Reply