व्हाट्सअँपवर मैत्री करत लैंगिक शोषण व तब्बल १४ लाख उकळले : महाराष्ट्रातील घटना

By | July 13, 2018

whatsapp group admin will get additional rights version 2 17 430

गोड बोलून मोबाईल नंबर मिळवून पुढे मैत्रीचे नाटक करत शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नाला नकार दिल्या प्रकरणी कुणाल पुखराज हिंगर या कथीत व्यापार्‍याला बुधवारी अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. मरिन लाईन्स येथील एका बड्या हॉस्पिटलमधील ४० वर्षीय डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिची फसवणूक करण्यात आली. आरोपी कुणाल यास अटक करण्यात आली असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल हा विलेपार्ले यामध्ये राहतो, कुणालची आई तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ साली दक्षिण मुंबईतील मारिन लाईन्स येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होती. त्यावेळी कुणालने पीडित डॉक्टर महिलेशी मैत्री जुळवत त्यांचा मोबाइल नंबर मिळवला नंतर तो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून डॉक्टर महिलेशी संपर्क वाढवू लागला .सप्टेंबर २०१५ रोजी कुणालने अंधेरी येथे राहणार्‍या बहिणीच्या घरी तिला जेवणासाठी बोलाविले होते. जेवणानंतर त्याचे आई-वडील नातेवाईकांकडे निघून गेले. यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी बळजबरीने लैंगिक शोषण केले त्यानंतर तो तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवू लागला तसेच गोड बोलत बोलत त्याने डॉक्टरकडून १४ लाख ७५ हजार रुपये उकळले.

मात्र पैसे मिळाल्यानंतर कुणालने लग्न करण्यास नकार दिला.तसेच तिला टाळायला सुरु केले, शेवटी वैतागून पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. बुधवारी पोलिसांनी कुणाला चौकशीसाठी बोलाविले होते. त्याची जबानी नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुणालविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२० आणि ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.