एन्काउंटरच्या नावाखाली सर्वाधिक हत्या ‘ ह्या ‘ समाजातील आणि ‘ ह्या ‘ राज्यातून : राज्यांचे आकडे

By | May 11, 2018

fake encounter uttar pradesh

उत्तर प्रदेशात एन्काउंटरच्या नावाखाली खून केले जात असून त्यात मरणाऱ्यांमध्ये दलित आणि मुस्लिम समाजातील लोक सर्वाधिक असल्याचा धक्कादायक दावा मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करावी, अशी मागणीही या संस्थेकडून करण्यात आली आहे.

‘सिटीजन अगेन्स्ट हेट’ या संस्थेने हा दावा केला असून तसा अहवालही त्यांनी तयार केला आहे.उत्तर प्रदेशात १६ आणि मेवात परिसरात झालेल्या १२ एन्काउंटरची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. २०१७-२०१८ मध्ये हे एन्काउंटर झाले होते. सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण यांनी हे एन्काउंटर नसून खून असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं उत्तर प्रदेशात त्यांची स्वतंत्र टीम पाठवून या प्रकरणाची चौकशी करावी, असे देखील प्रशांत भूषण यांचे म्हणणे आहे.

‘कोणताही न्याय न करताच या हत्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या अशा प्रकारच्या हत्यांची चौकशी कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केल्या जातात. अशा चौकश्यांना स्वतंत्र आणि निष्पक्षपाती चौकशी म्हणता येणार नाही. त्यामुळेच आयोगाने त्यांची स्वतंत्र टीम पाठवून या प्रकरणाची चौकशी करायला हवी,’ असंही भूषण यांनी सांगितलं. एन्काउंटरच्या नावाखाली करण्यात आलेल्या खूनांची चौकशी आयोगानं करावी म्हणून ‘सिटीजन अगेन्स्ट हेट’ या संस्थेच्या शिष्टमंडळाने आयोगाचे अध्यक्ष एच. एल. दत्तू यांची भेटही घेतली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झालं आहे. या १२ महिन्यात १२०० एन्काउंटर करण्यात आले आहेत. त्यात ५० हून अधिक गुंडांना ठार मारण्यात आले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर एन्काउंटर होऊनही उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीत काहीही कमी झाली नसल्याचंही उघड झालं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार १ जानेवारी २००५ ते ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत म्हणजे गेल्या १२ वर्षात देशात १२४१ बनावट एन्काउंटर झाले आहेत. त्यातील ४५५ बनावट एन्काउंटर एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. याच १२ वर्षात उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत ४९२ जणांचा मृत्यू झाला आहे

  • बनावट एन्काउंटरचे देशभरातील आकडे

यूपी- ४५५, असाम- ६५, आंध्रप्रदेश- ६३, मणिपूर-६३3, झारखंड- ५८, छत्तीसगड- ५६, मध्यप्रदेश- ४९, तमिलनाडू- ४४, दिल्ली- ३६, हरयाणा- ३५, बिहार- ३२, पश्चिम बंगाल- ३०, उत्तराखंड- २०, राजस्थान-१९, महाराष्ट्र- १९, कर्नाटक- १८, गुजरात- १७, जम्मू-कश्मीर- १७, केरळ- ०३, हिमाचल- ०३.

कर्नाटकमध्ये भाजपला मिळतील ‘ इतक्या ‘ जागा : अमित शाह यांचा विश्वास

काँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये ताव मारुन भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचार : ६० वर्षे काय केले ?

किती सालापर्यंत नरेंद्र मोदी यांची एकहाती सत्ता राहणार भारतात ? : ब्लूमबर्ग मीडियाचा ताजा सर्व्हे

नीरव मोदी फरार होण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचा ‘ ह्या ‘ माजी पंतप्रधानांचा दावा

काँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी , पंतप्रधान मोदी यांची भाषा घसरली

आणि भाजपाने शहीद म्हणून गौरवलेला ‘ तो ‘कार्यकर्ता चक्क जिवंत : काय आहे बातमी ?

स्टार प्रचारक आणि संस्कारी शोकांतिका : मुकेश माचकर यांचा अप्रतिम लेख

नोटाबंदीनंतर बँकांनी मोडले १९६३ पासूनचे ५५ वर्षाचे रेकॉर्ड : काय आहे रेकॉर्ड ?

म्हणून आम्ही एकट्या नरेंद्र मोदींसाठी कर्ज डोक्यावर घ्यायचे का ? राज ठाकरे यांचा हल्लाबोल

अखेर नाणारच्या जमिनी गुजरात्यांनी लाटल्याचे स्पष्ट : राज ठाकरे याचा आरोप खरा ठरला

शौचालय बांधले पण पाणी आहे का ? : महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्याच सभेला अभूतपूर्व प्रतिसाद

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा