फेसबुक फ्रेंडच्या पहिल्याच भेटीचा ‘ असा ‘ झाला दुर्दैवी अंत : महाराष्ट्रातील घटना

By | January 8, 2018

जळगाव येथील रामानंदनगर मध्ये राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलीशी फेसबुकच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळवून तिला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागील जंगलात भेटण्यसाठी बोलवले आणि तिच्यावर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोशल मीडियामधून मैत्री करून असे प्रकार याआधी देखील झाल्याचे उघडकीला आले आहे . आरोपीने ह्या मुलीशी फेसबुकवर मैत्री केली पुढे ह्याचे रूपांतर प्रेम संबंधात झाले मात्र एकमेकांची भेट झालेली नव्हती. काही कालावधीनंतर त्याने तिला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागील जंगलात भेटायला बोलवले आणि तिथे अमानुष बलात्कार केला. ही घटना साधारण एक महिन्यापूर्वीची आहे.

ह्या दुर्दैवी प्रकारानंतर त्या मुलीने ही घटना कोणाला सांगितली नाही. मात्र आरोपीने ह्या काढले व ते मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर पाठवले आणि परत ह्या मुलीशी संपर्क करत , ‘तुझ्या एखाद्या मैत्रिणीसोबत संबंध जुळवून दे… अन्यथा तुझे फोटो आणि अश्‍लील व्हिडिओ व्हॉटस्‌ॲप, फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल करणार’, अशी धमकी ह्या आरोपीने दिली. ब्लॅकमेल च्या ह्या प्रकरणानंतर मात्र ही तरुणी अत्यंत घाबरली आणि सर्व कुटुंबाने मिळून ह्या विकृत तरुणाला धडा शिकवायचे ठरवले आणि त्याच्याविरुद्ध पाळधी औटपोस्टला गुन्हा दाखल केला . पीडित कुटुंबीय हे सामान्य नोकरदार वर्गातले असून ह्या प्रकाराने प्रचंड मानसिक दबावाखाली आहे.

  • संबधित बातम्या

पुण्यातील कोंढवा परिसरात २३ वर्षीय तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार

पुण्यात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला : चार दिवसांपासून होती बेपत्ता

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

पोटासाठी पुण्यात येऊन लेकरू गमावलं : लैंगिक अत्याचार करून खून

जळगावमधील रामानंदनगर परिसरातील पंधरा वर्षीय मुलीची फेसबुकवर या तरुणाशी मैत्री झाली. मैत्रीनंतर दोघांची नियमित फेसबुक चॅटिंग सुरू होती. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अल्पवयीन निर्भयाला कसलीच कल्पना नसताना समरने गेल्या २ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या मागील टाकरखेडा जंगलात नेऊन भरदुपारी अडीच वाजता जबरदस्ती अत्याचार केला. आणि ह्या प्रकारचे काही फोटो काढून तो तिला ब्लॅकमेल करत होता. असाच काहीसा प्रकार त्याने ह्या मुलीच्या मैत्रिणीसोबत देखील केलेला आहे. तपासात पीडित तरुणीशी मोबाईलवर झालेले संभाषण, संशयिताने पाठविलेल्या फोटोसह इतर आवश्‍यक पुरावे पोलिसांची हस्तगत केले असून सायबर क्राईम विभागाचे देखील सहकार्य घेण्यात येत आहे.

याआधी देखील अशा काही स्वरूपाच्या घटना समोर आलेल्या आहेत . मात्र मुलींनी देखील यापुढील काळात अनोळखी व्यक्तीला भेटायला जाताना कुठल्या स्थळी जातोय , व्यक्ती कोण आहे याचे भान ठेवायला हवे .

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा