२०१८ पासून ‘ हे ‘ महत्वाचे बदल करणार फेसबुक स्वच्छता अभियान : महत्वाची बातमी

By | January 13, 2018

facebook cleans up newsfeed with new algorithm 2018

मार्क झुकरबर्ग यांनी नवीन वर्षात फेसबुक स्वच्छता अभियान हाती घेतले असून फेसबुकवर मित्रांच्या पोस्ट, नातेवाईकांच्या पोस्ट यांना फेसबुकच्या न्यूजफीड मध्ये प्राथमिकता देण्यात येणार आहे . फेसबुकच्या सुरुवातीला देखील हेच उद्देश होते मात्र व्यावसायिक पेजेस फेसबुकवर सुरु झाली आणि प्रकाशन संस्था, बातम्यांचे पोर्टल यांनी न्यूजफीड हायजॅक करून टाकले. आपण लॉगिन केल्यावर प्राथमिकता ही मित्रांचे अपडेट पाहणे ही असते मात्र आता लॉगिन केल्यावर बातम्या आणि इतर गोष्टीच जास्त दिसतात मित्रांच्या पोस्ट कमी दिसतात . मात्र हे नवीन बदल झाल्यावर याचा परिमाण आपल्याला दिसून येईल. अर्थात पेज ऍडमिन आणि न्यूज पोर्टलसारख्या वेबसाईट यांच्या दृष्टीने ही बातमी वाईट आहे.

मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून दिली आहे, त्यात ते म्हणतात , व्यवसायांच्या पोस्ट्स आणि न्यूज मीडियाने टाकलेल्या पोस्टला या नव्या न्यूजफीडमध्ये कमी प्राधान्य असेल. त्याऐवजी नातेवाईक आणि मित्रांनी टाकलेल्या पोस्ट आपल्याला अधिक प्रमाणात पाहायला मिळतील. ज्या पोस्टमुळं एकमेकांसोबत आपला संवाद वाढू शकेल, अशा पोस्ट जास्तीत जास्त दिसतील.

याआधी , सध्या ज्या पोस्टला लोकांची अधिक पसंती मिळते, शेअर किंवा कमेंट मिळतात, त्याच पोस्ट आपल्याला आपल्या न्यूजफीडमध्ये अधिक दिसत असत मात्र आता ही पद्धत बदलून आपल्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या पोस्टला प्राधान्य दिलं जाणार आहे.अर्थात काही चतुर लोकांकडून लाईक करा, शेअर करा, टैग करा, पुढील वाक्य पूर्ण करा अशा पद्धतीने देखील फेसबुकवर काम केले जाते . अशा पेजेसचा रिच देखील कमी होणार आहे.

व्यावसायिक आणि माध्यमांच्या पोस्ट वारंवार न्यूजफीडवर येऊ लागल्यामुळं फेसबुकच्या लोकप्रियतेला फटका बसल्याची कबुली फेसबुकनं दिली. आता, एखाद्या ब्रॅंडनी किंवा माध्यमांनी पोस्ट केली असेल आणि त्यावर लोक चर्चा करत असतील, तरच ती पोस्ट पुढे प्रमोट केली जाईल. या नव्या पद्धतीमुळं लोक फेसबुकवर कमी वेळ राहण्याचा धोका आहे. पण फेसबुकवर घालवलेला वेळ सत्कारणी लागेल,” असे देखील मार्क झुकरबर्ग यांच्याकडून सांगण्यात आले.

  • सोशल मीडिया एक्सपर्ट यावर काय म्हणतात ?

हा एक मोठा बदल असून याचा सर्वाधिक फटका प्रकाशन उद्योगातल्या लोकांना बसणार आहे. यापुढं माध्यमांनी टाकलेल्या पोस्ट खूप कमी प्रमाणात दिसतील. ज्या विषयावर जास्त चर्चा होईल अशा पोस्ट समोर येतील, असं फेसबुक म्हणतंय. पण यामुळं ज्या विषयावर वाद-विवाद होत आहे, त्याच पोस्ट समोर येण्याची शक्यता आहे. मात्र एकेकाळी फेसबुकवर मैत्रीपूर्ण आणि घरगुती वातावरण असायचं. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांची ही ओळख पुसट होत चालली आहे. आपली जुनी ओळख परत मिळवण्यासाठी फेसबुक प्रयत्न करत असल्याचं एकंदरीत दिसत आहे.  खोट्या बातम्या पसरवण्यासाठी लोकांनी फेसबुकचा वापर केला, त्यातून फेसबुक सावरण्याचा प्रयत्न करीत आहे असे देखील म्हटले जातेय.

मात्र बहुतांश फेसबुक पेज चालवणाऱ्या संस्था ह्या फेसबुकला पैसे देऊन आपले पेजेस प्रोमोट करतात . मात्र त्यांचा देखील रिच कमी होत असेल तर नुसते लाईक वाढून काय फायदा जर फेसबुक त्यांची पोस्ट लोकांपर्यंत पोहचवतच नाही ? अशा वेळी फेसबुकच्या जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो. मात्र लोकांना चांगला इंटरफेस मिळाला पाहिजे यासाठी फेसबुकने हा धोका पत्करायची तयारी केलेली दिसतेय .न्यूज वेबसाइटला बहुतांश ट्राफिक फेसबुकच्या माध्यमातून मिळतं. त्यातून फेसबुकला देखील प्रमोशनचे पैसे मिळतात. मात्र न्यूजफीडमध्ये जर पोस्ट दिसल्याच नाहीत तर फेसबुकचे देखील उत्पन्न यामुळं घटेल. हा निर्णय फेसबुकला कुठे घेऊन जाईल हे येणार काळ ठरविलच.

बंद झालेली तुमची लाडकी सोशल मीडिया वेबसाईट ‘ ह्या ‘ नावाने येणार परत

आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत

ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

‘ ह्या ‘ पद्धतीने ओळखा सरकारी नोकरीसाठी आलेली फसवी जाहिरात

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा