प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी स्वतःच्या पत्नी व बाळाची केली हत्या : महाराष्ट्रातील संतापजनक घटना

By | June 10, 2018

husband murders wife & commits sucide in ahmednagar akole

प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या पत्नी आणि दहा महिन्यांच्या बाळाची हत्या करवून आणल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार हिंजवडी (पुणे ) जवळील नेरे भागात भागात घडला आहे. यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव अश्विनी भोंडवे तर बाळाचे नाव अनुज असे आहे. दत्ता भोंडवे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणात दत्तासह त्याची प्रेयसी व दोन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. शनिवार रात्रीची ही घटना असून दत्ताने आपल्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला करुन पत्नी-मुलाची हत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

  • काय आहे प्रकरण ?

३० वर्षीय दत्ता भोंडवेचे लग्नानंतरही एका महिलेशी प्रेमसंबंध होते. पत्नीचा काटा काढल्यानंतरच तुझ्याशी लग्न करता येईल असं दत्ताने आपल्या प्रेयसीला सांगितलं होतं. त्यानंतर दत्ता व प्रेयसी यांनी मिळून आणखी दोघांना पत्नी व मुलाची हत्या करण्याची सुपारी दिली .पत्नी आणि मुलासह सासुरवाडीवरुन परतत असताना दत्ता भोंडवेने पाणी पिण्याच्या बहाण्याने मुंबई-बंगळुरु महामार्गावर मोटार थांबवली. यावेळी दोन अज्ञात इसमांनी मोटारीत शिरुन आश्विनी भोंडवे यांच्या तोंडावर रुमाल ठेवत गाडी जांभे गावाच्या पुढे गाडी नेण्यास सांगितले . मोटर पुढे गेल्यानंतर मारेकऱ्यांनी दत्ताच्या मानेवर चाकू लावला. मारेकऱ्यांनी या दोघांकडील पैसे आणि दागिने चोरले. यानंतर त्यांनी दत्तावर चाकूने वार केले. त्यानंतर दोन्ही मारेकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने आश्विनीचा गळा आवळून खून केला. यावेळी गाडीत असलेला दहा महिन्याचा अनुज रडायला लागल्यामुळे, त्याला गप्प करण्यासाठी दोन्ही मारेकऱ्यांनी त्याचा देखील अमानुष खून केला.

दोन्ही मारेकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने आश्विनीचा गळा आवळून खून केला. यावेळी गाडीत असलेला दहा महिन्याचा अनुज रडायला लागल्यामुळे, त्याला गप्प करण्यासाठी दोन्ही मारेकऱ्यांनी त्याचीही हत्या केली. दोघांचीही हत्या केल्यानंतर दत्ताने गाडीतील रोखरक्कम चोरीला गेल्याचाही बनाव रचला. मात्र पोलिसी खाक्यापुढे या आरोपींचं काहीही चालू शकलं नाही. या प्रकरणी सध्या चारही आरोपी हिंजवडी पोलिसांच्या अटकेत असून अधिक चौकशी सुरु आहे.