धक्कादायक : लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांच्या खून प्रकरणी धक्कादायक वृत्त

By | December 1, 2017

durgesh bokade commits sucide in raipur hotel accused for murder of rahul agrekar

नागपूर येथील प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे अपहरण आणि जिवंत जाळून खून केल्या प्रकरणी दुसरा मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने आज सकाळी ( शुक्रवारी ) छत्तीसगडमध्ये आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. नागपूर शहर पोलीसांना रायपूर पोलिसांकडून हे वृत्त कळताच पूर्ण नागपूर शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.नागपूरचे लाॅटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे दुकानांमधून अपहरण करून १ कोटीची खंडणी मागितली आणि नंतर त्यांचा जाळून खून करण्यात आला . ह्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी पंकज हारोडेला कोलकात्याहून अटक करण्यात आली होती तर दुसरा आरोपी दुर्गेश बोकडेहा फरार होता.

राहुल आग्रेकर यांची दारोडकर चौकात जैन लॉटरी एजन्सी आहे. ते मोठ्या प्रमाणात विदर्भातील लॉटरी सेंटर्सना लॉटरीचा पुरवठा करत होते . राहुल यांचे अपहरण करणारे दुर्गेश बोकडे व पंकज हारोडे हे एकमेकांशी परिचित होते . मागील आठ वर्षांपासून त्यांची एकमेकांशी ओळख होती, मात्र काही दिवसांपासून तिघांमध्ये पैशाचा वाद सुरु होता त्यातूनच ही हत्या झाली असावी असे बोलले जात आहे.

दुर्गेश बोकडे याने पंकजच्या मदतीने राहुल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा प्लॅन केला . मंगळवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी ८ च्या सुमारास ते बोलेरो गाडीमधून दारोडकर चौकात आले व राहुल यांना घेऊन तिघेही बाहेर पडले. त्याच दिवशी सकाळी ११. ३० च्या दरम्यान राहुल यांनी पत्नी अर्पिता यांच्या मोबाइलवर राहुल यांनी फोन केला व मी दीड तासात घरी येतो असे सांगितले. नंतर परत दुपारी २ वाजता राहुल यांचे मोठे बंधू जयेश यांच्या मोबाइलवर राहुलच्या मोबाइलवरून फोन आला व आता राहुल जिवंत हवा असेल तर १ कोटी रुपये दे असे धमकावण्यात आले. हा आवाज दुर्गेश ह्याचा होता .

दरम्यान, बुटीबोरी येथे राहुल यांचा जळालेला मृतदेह मिळाला होता. या प्रकरणी लॉटरी सेंटर चालविणाऱ्या आणि राहुल यांचा मित्र असलेल्या दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे या दोन संशयित आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला होता . प्रमुख संशयित आरोपी पंकज हारोडेला कोलकात्याहून अटक करण्यात आली होती तर दुसरा आरोपी दुर्गेश बोकडे हा फरार होता. मात्र आज सकाळी त्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे रायपूर पोलिसांकडून नागपूर पोलिसांना कळवण्यात आले. दुर्गेश तेथून पळून छत्तीसगडमधील रायपूरला आला. येथे त्याने दोन दिवस कसे बसे काढल्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.

धक्कादायक.. एक कोटीच्या खंडणीसाठी जिवंत जाळले : महाराष्ट्रातील घटना

अखेर लाॅटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांच्या खूनप्रकरणातील एक आरोपी धरला

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

सांगलीजवळच्या डोंगरात नरबळीचा प्रकार ? : मूर्तीसमोर आढळला मृतदेह

? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?