जर मला आत पाठवले तर मी तुमचे पैसे कसे देऊ शकेल ? : डीएसके यांचा गुंतवणूकदारांना प्रश्न

By | October 17, 2017

dsk promises investors for refund in pune

महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णींवर गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर सात वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत. डीएसकेंतर्फे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. शिवाय पुणे-सोलापूर महामार्गालगतचा ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला काढला असून एका अमेरिकन कंपनीने त्यात रस दाखवल्याचे देखील डीएसके यांच्याकडून सांगण्यात येतंय .

डीएसके पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेशन विभागात हजार झाले होते, तेव्हा जमलेल्या गुंतवणूकदारांना उद्यापासून टप्प्याटप्प्याने पैसे परत करण्यास सुरुवात करु, असं आश्वासन डीएसकेंनी दिलं. त्यासाठी साडे चार कोटी रुपयांची तजवीज केली आहे. मात्र तुम्ही मला तुरुंगात पाठवलं तर तुमचे पैसे का देऊ, आणि मी बाहेर थांबलो तर काही तजवीज करू शकतो. मला आत पाठवून काय होणार असाही प्रश्न डीएसकेंनी गुंतवणूकदारांना केला.

ड्रीम सिटी हा डीएसकेंचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. मात्र ह्या प्रकल्पाच्या प्रेमापोटी डीएसके यांच्यावर ही वेळ आल्याचं बोललं जातंय . मात्र आता ड्रीम सिटी विक्रीला काढली आहे. त्यासाठी एक अमेरिकन कंपनी पाहणी करण्यासाठीही येणार आहे.गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे.त्यात आर्थिक मंदी आणि पुढे नोटबंदी यांनी बांधकाम व्यवसायाचे कंबरडेच मोडून गेले आहे. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अडचणीत आले आहेत. मात्र आता गुंतवणुकदारांची अडचण झाली असून ते डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत.

काहींनी २०१४ पासून अनेकांनी घरं बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. २०१४ पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट सुरु केल्यापासून मंदी आणि पुढे नोटबंदी यामुळे गाडी घसरली. ह्या ड्रीम सिटी मध्ये कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा घेतली होती. मात्र ह्या ड्रीम सिटी मध्ये वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती . अडचणींमध्ये आपल्यावर इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ह्या व्यवसायात वळवली. शेअर बाजारातूनही काही पैसा उभा केला.

ड्रीम सिटी साठी आणखी पैसे उभे करण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर १२ टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे बऱ्याच लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले.सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण पुढे हे सार अवघड होत गेलं. डीएसकेंच्या वीसहून अधिक कंपन्या असून तेथील कर्मचाऱ्यांचे वेतन देखील सध्या वेळेवर होत नाही. हे स्वतः डीएसके यांना मान्य असून नशिब आणि नोटबंदी ही दोन मुख्य कारणे असल्याचे डीएसकेंचे म्हणणे आहे. आर्थिक मंदी आणि नोटबंदीमुळे अनेक व्यवसाय देशोधडीला लागले आहेत आणि आपणही त्यामुळेच अडचणीत आल्याचा दावा डीएसके करत आहेत.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply